घरताज्या घडामोडीNCBची मोठी कारवाई: बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज पुरवणारा सुफियान गजाआड

NCBची मोठी कारवाई: बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज पुरवणारा सुफियान गजाआड

Subscribe

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याच्या चौकशी दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर आली. तेव्हापासून एनसीबीच्या ड्रग्ज प्रकरणातील कारवाया सुरू आहेत. काल, बुधवारी मध्यरात्री मुंबई एनसीबीने मोठी कारवाई केली. बॉलिवूड कलाकारांनी ड्रग्ज पुरवणारा सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मिरारोड परिसरातून एनसीबीने अटक केले होते. तसेच त्याच्यासोबत एक नायजेरियन व्यक्तीला देखील अटक करून दोघांनी NDPS कोर्टात दाखल केले होते. कोर्टाने या दोघा आरोपींना ५ दिवसांची एनसीबीने कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

कारवाईसाठी एनसीबीने रिक्षा चालकाचे केले वेशांतर

देशाच्या विविध ठिकाणी हा विमान प्रवासात साहित्यातून छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी करायचा. याच्या चौकशीतून तस्करीत त्याला मदत करणाऱ्या एका नायजरियन तरुणालाही एनसीबीने अटक केली आहे. या नायजरियन तस्कराला पकडण्यासाठी एनसीबीने रिक्षा चालकाचे वेशांतर केले होते. एनसीबीने या नायजरियन तस्कराकडून मोठ्या प्रमाणात एमडी आणि कोकेन हे ड्रग्ज जप्त केले आहे.

सुफियान हा भारतातील अनेक उच्चभ्रू व्यक्तींना ड्रग्ज पोहोचवत असल्याचे तपासात समोर आले आहे. ज्यात काही बॉलिवूडमधील कलाकारांचाही समावेश आहे. सुफीयानने या तस्करीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले होते. सध्या तो मिरारोडच्या उच्चभ्रूवस्तीत राहायला होता. तिथूनच त्याला काल, रात्री एनसीबीने अटक केली आणि आता ५ दिवसांची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भोसरी MIDC जमीन घोटाळा: ईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू; खडसेंचा आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -