घरमहाराष्ट्रभोसरी MIDC जमीन घोटाळा: ईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू; खडसेंचा आरोप

भोसरी MIDC जमीन घोटाळा: ईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू; खडसेंचा आरोप

Subscribe

भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं. मात्र, प्रकृती अस्थिर असल्यामुळे खडसे चौकशई हजर राहणार का? याबाबत संभ्रम होता. तथापि, एकनाथ खडसे हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला.

“मला असं वाटतं की मी पक्ष बदलल्यानंतर भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर माझ्या चौकशीला सुरुवात झाली. त्यामुळे हा विषय संपूर्णपणे राजकीय हेतूने आहे असं माझं मत आहे. कुठून तरी छळावं, नाथाभाऊंना अडकवण्यात यावं, अशा स्वरुपाचा प्रयत्न आहे,” असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. “गेल्या आठ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवरती फिरतंय, अभी कुछ तो होने वाला है ! ज्या अर्थी हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवती फिरतंय, त्याचा अर्थ असा आहे की हे सगळं षडयंत्र आहे. परंतु जे काही असेल त्याला मी सामोरे जायला तयार आहे,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

- Advertisement -

ही एमआयडीसीची जमीन नाही, ही जमीन खासगी आहे. एमआयडीसीने या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. एमआयडीसीने मोबदला दिलेला नाही. एमआयडीसीने ताबा घेतलेला नाही. या भूखंडावर अजूनही ज्यावेळेसे मी खरेदी केली त्यावर मूळ मालकाचं नाव आहे. हा खासगी व्यवहार होतो. हे वारंवार सांगितलं आहे. तरी ज्या काही चौकशा होतील त्याला सामोरे जायला तयार आहे,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -