घरताज्या घडामोडीMuzaffarnagar School Incident: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मूग गिळून का बसल्या, राष्ट्रवादी...

Muzaffarnagar School Incident: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मूग गिळून का बसल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

Subscribe

मुंबई – उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओवरुन आरोप होत आहे की, एक शिक्षिका मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांना मारायला लावत आहे. विद्यार्थीही त्या मुलाच्या गालावर चपराक लगावत आहेत. मुलाचे गाल लाल झाल्याचे सांगत शिक्षिका नंतर पीडित विद्यार्थ्याच्या पाठीवर मारण्यास सांगते. त्यासोबतच मुस्लिम समाजाबद्दल अपशब्दांचाही वापर करताना दिसते. या घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) या मुद्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या अद्याप मूग गिळून का बसल्या आहेत, असा सवाल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शनिवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथील घटनेवरुन केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींवर निशाणा साधला आहे. ईराणी या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री आहेत, त्यांच्याच खात्याच्या संबंधी हे प्रकरण असताना त्यांनी 24 तास उलटून गेल्यानंतरही भाष्य केलेले नाही. ईराणी या उत्तर प्रदेशमधूनच खासदार आहेत.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

मुजफ्फरनगर येथील खासगी शाळा नेहा पब्लिक स्कूलच्या शिक्षिका तृप्ती त्यागी या त्यांच्या वर्गातील एका मुलाला सर्वांसमोर उभं करतात आणि इतर विद्यार्थ्यांना एक-एक करुन त्याच्या गालावर चापराक मारायला लावतात. या घटनेचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शिक्षिका तृप्ती त्यागी म्हणतात, की मुस्लिम मुलांच्या आई या त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मुलांचा नाश होत आहे. त्यासोबत अल्पसंख्याक समाजाबद्दल आणखी एक टिप्पणी केली. हा सर्व प्रकार तिथे बसलेली एक व्यक्ती मोबाईलमध्ये शूट करुन घेते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी शिक्षिकेवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर देशभरातून शिक्षिका तृप्ती त्यागींवर कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा : धक्कादायक : दलित तरुणांना चोरीच्या संशयातून घरातून उचललं, झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो म्हणाले, कोणत्याही मुलाविरोधात अशा प्रकारचा व्यवहार हा गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षिकेला कठोर शिक्षा झाली पाहिजे. शिक्षिकेने जे केले आहे, त्यामुळे त्या मुलाच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या मुलांना मारण्यास सांगितले होते त्यांच्या मनावरही वाईट संस्कार होतील.

क्रॅस्टो यांनी या घटनेला घृणास्पद आणि कट्टरवादी म्हटले आहे. ते म्हणाले, देशाच्या महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या अल्पसंख्याक खात्याच्याही मंत्री आहेत, त्या या प्रकरणावर अजून काहीच बोलल्या नाही, याचे दुःख होते. हे प्रकरण थेट इराणी यांच्या दोन्ही मंत्रालया संबंधीत असतानाही त्या अद्याप मूग गिळून का बसल्या आहेत, असा सवाल राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे द्वेषाचे राजकारण आता शाळा आणि लहान मुलांच्या वर्गापर्यंत पोहचले  असल्याचा आरोप अॅड. आंबेडकरांनी केला आहे. ते म्हणाले हा व्हिडिओ भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचे उदाहरण आहे. भाजपच्या राज्यातच हे घडत आहे. आंबेडकरांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, जर या घटनेची कोणाताही धार्मिक बाजू नाही तर मग शिक्षिका एका विद्यार्थ्यांच्या धर्माचे नाव का घेत आहे. कायद्याच्या रक्षकांनी या घटनेची स्वतःहून दखल घेण्याची गरज असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -