घरक्राइमधक्कादायक : दलित तरुणांना चोरीच्या संशयातून घरातून उचललं, झाडाला उलटं लटकवून बेदम...

धक्कादायक : दलित तरुणांना चोरीच्या संशयातून घरातून उचललं, झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण

Subscribe

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दलित तरूणांना चोरीच्या संशयातून झाडाला उलटं बांधून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शेळी चोरीच्या संशयातून तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. पीडित तरुणांना शिरापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होत आहे. (Shocking Dalit youths are thrown out of the house due to suspicion of theft hanged upside down and beaten mercilessly)

हेही वाचा – ‘जेल तर जेल, दोन फटक्यात गेम’; खून केल्यानंतर आरोपीचे इंस्टाग्राम लाईव्ह

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शेळी आणि कबुतर चोरल्याचा संशय दलित तरूणांवर करण्यात आला. त्यानंतर त्या तरुणांना घरातून उचलून नेण्यात आले. त्यानंतर तरुणांना झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड आणि खंडागळे हे तरूण जबर जखमी झाले असून त्यांना शिरापूर येथील हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना पीडितांच्या कुटुंबियांनी समोर आणली. यानंतर दलित संघटनांनी आवाज उठवायला सुरूवात केली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तरुणांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरूणांना झाडाला उलटं लटकावून मारहाण होताना दिसत आहे. या घटनेनंतर दलित समाजाकडून तसेच अनेकांकडून संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 4 खासगी बसेसची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकत्यांना अटक; भाईंदरमधील प्रकार

दोन महिन्यांपूर्वीच दलित तरुणाची हत्या

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत असताना एका 24 वर्षीय दलित तरुणाची हत्या करण्यात आली. नांदेडमधील बोंदर हवेली गावात ही धक्कादायक घडणा घडली होती. अक्षय भालेराव असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी सवर्ण लग्नाचा आनंद साजरा करत होते. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या हातात तलवारी होत्या. यावेळी पीडित भालेराव आणि त्याचा भाऊ आकाश यांना पाहून लग्नाच्या ठिकाणी उपस्थित असलेला एक जण म्हणाला की, या लोकांना गावात भीम जयंती साजरी केल्याबद्दल शिक्षा द्यायली हवी. यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली आणि दोन्ही भावावर हल्ला करण्यात आला. यावेळी अक्षय भालेराव या तरुणाची तलवार भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -