Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र गुन्हेगारांमध्ये इंस्टाग्रामवर स्टेट्स, कमेंट अन् रील्सचे लाईव्ह टशन; वाचा, काय आहे 'आतली...

गुन्हेगारांमध्ये इंस्टाग्रामवर स्टेट्स, कमेंट अन् रील्सचे लाईव्ह टशन; वाचा, काय आहे ‘आतली बातमी’

Subscribe

नाशिक : ओम पवार उर्फ ओम्या खटकी या युवकाने आपल्या पाच साथीदारांसह संदीप आठवलेचा गुरुवारी (दि. २४) सायंकाळी छत्रपती शिवाजी चौक, जुने सिडको परिसरात वर्दळीच्या ठिकाणी अवघ्या १२ सेकंदात २७ वार करून निर्घूण खून केला. या थरारक घटनेमुळे शहरभरात खळबळ उडाली आहे. मात्र, ओम्या खटकी आणि संदीप यांच्यातील वादाची पार्श्वभूमी अधिक धक्कादायक आहे. कधीकाळी घनिष्ट मित्र असलेल्या या दोघांमधील वाद इन्स्टाग्रामवरील कमेंट, स्टेट्स व रील्समुळे विकोपाला गेल्याची माहिती समोर येत आहे.

ओम पवार व मृत संदीप हे दोघे एकमेकांचे घनिष्ट मित्र होते. मात्र, त्या दोघांचा इन्स्टाग्रामवरील मित्र परिवार त्यांचे स्टेटस ठेवत असे. तसेच, त्यांच्या पोस्टवर येत कमेंट करत असच. हे स्टेस, रील्स भाईगिरीशी निगडीत तसेच आव्हान देणारे असत. त्यातून दोघांच्याही मनात एकमेकांच्या विरोधात इर्षा निर्माण झाली. सुरुवातीला एकमेकांना उद्देशून रील्स, कमेंट, स्टेटस असल्याचा गैरसमजातून इर्षा निर्माण झाल्यानंतर त्यांनी थेट एकमेकांना आव्हान देणार्‍या पोस्ट इन्स्टाग्रामवर अपलोड करायला सुरुवात केली. यात त्यांचे इन्स्टा फॉलोअर्सही सामील झाल्याने सर्वप्रकाराला वेगळे वळण लागले व ही बाब थेट हाणामारीपर्यंत गेली.

- Advertisement -

दोन महिन्यांपूर्वी दोघांची मारामारी झाल्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या ओम पवारला दाखवला होता. त्यानंतर तो काही महिने नाशिकबाहेर होता. साधारण २ महिन्यांपूर्वी परतल्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला. नाशिकमध्ये येताच ओमने इन्स्टावर आपले गारूड पसरवायला सुरुवात केली. परिणामी इस्टाग्रामवर पुन्हा युद्ध सुरू झाले. त्यातच जुलै महिन्यात पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेल मध्ये ओम मद्यप्राशन करत असताना संदीप आठवलेेने त्याच्यावर हल्ला चढवला. यात त्याच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून त्याला बेदम मारहाण केली तसेच या सर्व मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या संपूर्ण व्हिडिओतील काही भाग संदीपने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि तेच खरे खूनाचे कारण ठरल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे. तेवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. तर, संदीप व त्याच्या साथीदारांनी ओम पवारला त्या हॉटेलमधून इतरत्र घेऊन जात अधिक मारहाण केली. तसेच, त्याच्यासोबत अत्याचारदेखील केल्याचे बोलले जाते.

मारहाणीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर संदीपने तसेच त्याच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सने ओम्या व त्याच्या फॉलोवर्सला डिवचायला सुरुवात केली. ‘काय तुमचा भाई मार खातो, पाया पडतो’ अशा चिथावणी देणार्‍या पोस्टदेखील इन्स्टावर टाकल्या गेल्या. इतर अश्लील कमेंटही यानिमित्ताने टाकण्यात आल्या. त्यावरून इन्स्टाग्राम लाईव्हचा खटाटोप दोघांमध्ये वाढला. यातून आपली बदनामी होते आहे अशी भावना निर्माण झाल्याने ओमने संदीपला धडा शिकवण्याचे ठरवले. याच दरम्यान, गेल्या शुक्रवारी (दि. १८) कॉलेज रोड परिसरातील एका कॅफेमध्ये संदीप आपल्या एका मैत्रिणी सोबत कॉफी पिण्याचा आनंद घेत असताना ओम पवारने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. ही सगळी घटना कॅफेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ओमला वाटले होते की कॅफेवर हल्ला केल्यानंतर आता संदीप शांत बसेल. मात्र झाले उलट. त्यानंतर संदीप आणि त्याच्या इंस्टाग्रामवरील फॉलोवर्सने तसेच ओमच्याही फॉलोवर्सने एकमेकांना अधिक तीव्रतेने आव्हान द्यायला सुरवात केली.

- Advertisement -

गुरुवारी (दि. २४) संदीपचा खून होण्याच्या आधी देखील दोघेही एकाच वेळी लाईव्ह आले. दोघेही एकमेकांना जोडले गेले आणि त्यांचा लाईव्ह सुरू असतानाच वाद झाला. शिवीगाळ, धमकी तसेच एकमेकांचे व्हिडिओ दाखवणे असा सगळा प्रकार यावेळी बराचकाळ चालला. धक्कादायक बाब म्हणजे, हे दोघे इंस्टाग्राम लाईव्हवर एकमेकांशी वाद घालत असताना दोघांचेही तब्बल ६०० हून अधिक फॉलोअर्स बघत होते. शेवटी संदीपचा ‘गेम’ करायचा अशी ‘खटकी’ पडल्याने ओमने आपल्या ५ साथीदारांसह अवघ्या १२ सेकंदात संदीपचा खून केला. खून केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ओमने इन्स्टाग्राम लाईव्ह करत आपल्या फॉलोवर्सला ‘दोन टोल्यात संपवले’ असे म्हणत स्वत:च खुनाची बातमी दिली.

- Advertisment -