घरमुंबईफेसबुकवर मोजक्याच लोकांशी मैत्री करा, अन्यथा धोका!

फेसबुकवर मोजक्याच लोकांशी मैत्री करा, अन्यथा धोका!

Subscribe

फेसबुकमार्फत मैत्री करुन लोकांना लुबाडणाऱ्या लुटारुंचा मोठा गृप फेसबुकवर सक्रिय झाला आहे. त्यामुळे या लुटारुंपासून सावध राहण्यासाठी ओळखीच्याच मित्रांशी फेसबुकवर मैत्री करणे, हा योग्य पर्याय आहे.

फेसबुकवर ओळखीच्याच मित्रांसोबत मैत्री ठेवणं योग्य आहे. कारण फेसबुकवर मैत्रीच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बऱ्याच घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशा घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईच्या लोअर परळ येथील एका शिक्षिकेला फेसबुकच्या मार्फत मित्र बनवूण लुबाडण्यात आले आहे. या महिलेला संशय आल्यावर तिने ना. म. जोशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेला लुबाडणारा तरुण हा लुटारु टोळीचा सदस्य असल्याचे उघड झाले. ही टोळी बंगळुरु येथे आहे.

पोलिसांनी चार नायजेरियन तरुणांना केले अटक

बरेच लोक विरंगुळा म्हणून फेसबुकवर असतात. फेसबुकवर लहाणपणीचे, शाळेतील, कॉलेजमधील जुने मित्र भेटतात. त्यामुळे लाखो लोक फेसबुक वापरतात. परंतु, या फेसबुकवर आता लुटारुंची टोळी दाखल झाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून फेसबुक युजर्सला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील एका शिक्षिकेला या लुटारुंच्या एका टोळीने ६८ हजार रुपयांनी लुबाडले आहे. या टोळीचे नाव ‘सिमंड’ असे आहे. ‘सिमंड’ ही नायजेरियन तरुणांची टोळी आहे. त्यांनी आतापर्यंत फेसबुकच्यामार्फत बऱ्याच लोकांना गंडवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीतील चार नायजेरियन तरुणांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी लोअर परळच्या शिक्षिकेला अरविंदकुमार या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याने फेसबुकवर आपल्या प्रोफाईलमध्ये अमेरिकेच्या नौदलात कॅप्टन असल्याची माहिती टाकली होती. त्यामुळे शिक्षिकेने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये चॅट होत राहायचे. यातून त्यांची घट्ट मैत्री जमली. महिलेचा आपल्यावर चांगला विश्वास बसला हे पाहूण त्या तरुणाने आपण महिलेसाठी गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. दोन दिवसांनी महिलेला फोन आला. या फोनमध्ये सांगण्यात आले की, आम्ही कस्टममधून बोलत आहोत. तुमचे पार्सल आले आहे. हे पार्सल हवे असेल, तर तुम्हाला कर भरावे लागतील. महिलेने ते मान्य केलं आणि ६८ हजार रुपये संबंधित व्यक्तीच्या खात्यात भरले. यानंतर पुन्हा महिलेला पुन्हा फोन आला की, गिफ्टमध्ये डॉलर असल्यामुळे दोन लाख रुपये आणखी भरावे लागतील असे सांगण्यात आले. यावर महिलेला संशय आला. महिलेने ताबोडतोब ना. म. जोशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी तपास सुरु केला आणि मोठी टोळीचा यात समावेश असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी कसा लावला तपास?

पोलिसांनी ज्या बॅंक खात्यावर पैसे ट्रान्सफर केले गेले होते त्याचा तपास लावला. ते बॅंक खाते बंगळुरुतील असल्याचे माहित पडल्यावर मुंबई पोलिसांचे एक पथक बंगळुरु येथे पोहोचले. ज्या व्यक्तीच्या नावावर हे बॅंक खाते होते, त्याला शोधण्यात पोलिसांना यश आले. या व्यक्तीचे नाव झाकी उल्ला शरीफ असे होते. त्याने हे बॅंक खाते आपले असल्याचे मान्य करत आपण हे खाते मणिपुरचा नागरिक नरेश चिरोमला विकल्याचे सांगितले. या चिमोडला पोलिसांनी शोधून काढले. बंगळुरु येथे नायजेरियन तरुणांचा सिमंड नावाचा एक गृप आहे. तो लोकांना सोशल मीडियाच्या माध्याातून लुबाडतो, अशी माहिती चिरोमने दिली. या गृपला आपण बंगळुरु येथील स्थानिक नागरिकांचे बॅंक खाते मिळवूण देण्याचे काम करतो, अशी कबूली चिरोमने दिली. या चिरोमला पोलिसांनी अटक केली. यासोबतच आणखी तीन नायजेरियन तरुणांना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -