घरमुंबईजावेद अख्तरांच्या हिंदू संस्कृतीच्या विधानावर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

जावेद अख्तरांच्या हिंदू संस्कृतीच्या विधानावर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे दिवाळीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गीतकार जावेद अख्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुंबई : लखनऊमध्ये ये-जा करताना सर्वजण जय सिया राम म्हणत. त्यामुळे सीता आणि राम यांचा वेगळा विचार करणे हे पाप आहे, असे म्हणत गीतकार जावेद अख्तर यांनी हिंदू संस्कृतीतील सहिष्णुतेचे कौतुक केले. काल दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे दिवाळीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गीतकार जावेद अख्तर, लेखक सलीम खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाक जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानाबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Nitesh Rane’s reaction to Javed Akhtar’s statement on Hindu culture)

हेही वाचा – शिवप्रताप दिन! मराठी माणसाच्या धमन्यांमध्ये चैतन्य भरवणारा दिवस; उदयनराजेंचं ट्वीट

- Advertisement -

हिंदू सहिष्णुतेचे कौतुक केल्यानंतर नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत म्हटले की, “जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. जावेदच जितेंद्र करायचं असेल तरी देखील स्वागत करतो.” जावेद अख्तर हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. दोन वर्षांपूर्वी ज्यावेळी जावेद अख्तर यांनी संघाची तुलना तालिबान्यांशी केली होती, तेव्हा नितेश राणे यांनी त्यांना दोन पानांचे पत्र पाठवून माफी मागायला सांगितली होती. त्यामुळे आता अख्तरांबाब केलेले विधान हे टोला आहे की अजून काही, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.

लखनऊमध्ये ये-जा करताना सर्वजण जय सिया राम म्हणत. त्यामुळे सीता आणि राम यांचा वेगळा विचार करणे हे पाप आहे. हा शब्द प्रेम, ऐक्य आणि कौटुंबिक जीवनाचे प्रतीक आहे. फक्त एका व्यक्तीने त्यांना वेगळे केले, त्याचे नाव रावण होते. आज जो हे करेल तो रावणच असेल. भारतात लोकशाही टिकली असेल तर ती हिंदू संस्कृतीमुळेच. आपण बरोबर आहोत आणि इतर चुकीचे आहोत, असा विचार करणे हा हिंदू संस्कृतीचा भाग नाही. आता असहिष्णुता वाढत आहे, परंतु हिंदू संस्कृती सहिष्णू असल्याने देशात लोकशाहीही अबाधित आहे, असेही जावेद अख्तर यांच्याकडून सांगण्यात आले होते.

- Advertisement -

राम आणि सीता हे फक्त हिंदू देवता आणि देवी नाहीत तर हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. मी नास्तिक असलो तरी राम आणि सीता यांना आजही या देशाची संपत्ती मानतो. म्हणूनच मी इथे आलो आहे. रामायण हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. मला अभिमान आहे की मी राम आणि सीतेच्या भूमीवर जन्मलो. जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तमबद्दल बोलतो तेव्हा फक्त राम आणि सीता लक्षात येतात. त्यामुळे आजपासून जय सियाराम…, अशी घोषणा देखील जावेद अख्तर यांनी या कार्यक्रमात दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -