घरताज्या घडामोडीनितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत CSR जर्नल उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत CSR जर्नल उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

Subscribe

सामाजिक परिवर्तन नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आला.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी- म्हणजेच सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय, अभिनव आणि उत्तम कामगिरी केल्याबद्दल, 2021 चा सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार सोहळा मुंबईच्या  यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल, भगत सिंह कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.  तर विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

समाजातील वंचित घटकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक उद्यमशीलता अत्यंत महत्वाची आहे.  सामाजिक उद्यमशीलततेला प्रोत्साहन देतांना, सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक जनजागृती करण्याची गरज आहे, तसेच हे करतांना तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कारायला हवा, असे नितीन गडकरी कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

- Advertisement -

मानवतेच्या कल्याणासाठी विशेष उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सात श्रेणीत सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आले. कृषी आणि ग्रामविकास, कोविड-19 दरम्यान केलेले मदतकार्य, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता, क्रीडा तसेच महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण अशा क्षेत्रांत हे पुरस्कार प्रदान केले गेले.

- Advertisement -

सामाजिक परिवर्तन नेतृत्व पुरस्कार राज्याचे माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आला.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशासक दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सयाजी शिंदे यांना जबाबदार चित्रपट अभिनेता आणि पर्यावरणसंवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रकाश आमटे आणि श्रीमती मंदाकिनी आमटे आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

ऍडफॅक्टरचे व्यवस्थापकीय संचालक मदन बहल यांना जनसंपर्क क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मारीवाला हेल्थ इनिशिएटिव्हचे संचालक राज मारीवाला यांना युथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर मालविका अय्यर यांना इन्स्पायरिंग यंग चेंजमेकर अवॉर्ड आणि तन्मय भट यांना इन्फ्लुएंसिंग यूथ आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हेही वाचा – शेतकऱ्यांनी अन्नदाता होण्याबरोबरच ऊर्जा पुरवठादार बनण्याची गरज – नितीन गडकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -