घरमुंबईकेंद्रीय कॅबिनेट बैठकीत इंधन दरवाढीवर चर्चा नाही..!

केंद्रीय कॅबिनेट बैठकीत इंधन दरवाढीवर चर्चा नाही..!

Subscribe

इंधन दरवाढीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र सर्वसामान्यांना रोज भिडणारा इंधनाच्या किंमत वाढीच्या प्रश्नावर मात्र चर्चा झाली नसल्याने इंधनाच्या किंमती काही दिवसतरी जैसे थे असल्याच्या स्थीतीत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या बैठकीत इंधनदर वाढीच्या प्रश्नांवर चर्चा होऊन काही मार्ग निघेल अशी आशा सर्वसामान्यांमध्ये होती मात्र या बैठकीनंतर त्यांची निराशा झाली आहे.

आज दुपारी ३ वाजता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये इंधन प्रश्नावर सरकार दीर्घकालीन उपाय शोधणार असल्याचे सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सुरु झालेली इंधन दरवाढ अद्यापही कायम आहे. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडले असून मंगळवारी ही सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ करण्यात आली. सध्या मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८४.९९ म्हणजे ८५ रुपये तर डिझेलचा ७२.७६ रुपये आहे.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या करावरही रविशंकर प्रसाद यांनी प्रतिक्रीया दिली. लोकांच्या भल्यासाठीच हे कर लावण्यात आले आहेत. यातून मिळणाऱ्या पैशातून महामार्ग, एम्स आणि विद्यापीठे उभारली जातात. सध्या दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे जे दर आहेत, ते भारताच्या आजपर्यंतच्या काळात सर्वाधिक आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलने २०१३ मध्ये सर्वाधिक ७६.६ रुपयांचा दर गाठला होता. हा पैसा देशाच्या विकासासाठी वापरला जातो असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -