घरमुंबईपूर्व उपनगरातील नाले गाळातच; तरिही मुंबई तुंबणार नसल्याचा महापौरांचा 'विश्वास'

पूर्व उपनगरातील नाले गाळातच; तरिही मुंबई तुंबणार नसल्याचा महापौरांचा ‘विश्वास’

Subscribe

पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईच्या कामाला अजूनही वेग आलेला नाही. मागील दौऱ्यात महापौरांनी कामचूकार कंत्राटदारांवर कडक कारवाईचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. आज पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांच्या पाहणीत नाले गाळातच असल्याचे दिसून आले. या प्रकरणी महापौरांनी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांना फैलावर घेतले. मात्र अशाही परिस्थितीत मुंबईत पाणी तुंबणार नाही,असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

पावसाळ्याला जेमतेम पंधरा दिवसांचा अवधी उरला असताना नालेसफाईच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. आठ दिवसांपूर्वी पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर बुधवारी पूर्व उपनगरातील नालेसफाई कामांचा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आढावा घेतला. उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सामतकर, सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे, एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षा निधी शिंदे, नगरसेवक विजेंद्र शिंदे, राष्ट्रवादीच्या पालिका गटनेत्या राखी जाधव आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मिठी नदी (एमटीएनएल ब्रीज), लक्ष्मीबाग नाला, उषा नगर, बॉम्बे ऑक्सीजन, लल्लूभाई कंपाउंट जवळील मानखूर्द नाला, देवनार नाला, माहुल क्रीक आदी नाल्याची पाहणी केली. दरम्यान, ७० पैकी ६० टक्के सफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला. सफाई कामांसाठी पालिकेने यंदा दीडशे कोटी रुपये खर्च केला आहे. परंतु, यंदा हवी तशी नालेसफाई झालेली नाही. नाल्यांतून काही प्रमाणात काढलेला गाळ काठावर काढून ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी गाळ काढण्यासाठी नुकतेच कामगार आणि मशीन उतरविल्याचे दिसून आले. गमबूट, हातमोजे विना कामगारांना नाल्यात उरविण्यात आल्याने महापौरांनी अधिकाऱ्यांना खडसावले. तसेच ठेकेदारांना नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या. दरवर्षी विरोधकांकडून नालेसफाईवर आक्षेप घेतला जाता. यंदा महापौरांनी दुहेरी भूमिका मांडून प्रशासनाची कोंडी केली.
दरम्यान, नालेसफाई योग्य होत आहे. त्यामुळे नाल्यामुळे यंदा मुंबई तुंबणार नाही. पण मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मात्र मुंबई तुंबू शकते, असे भाकीत मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -