घरमुंबईमुंबई पोलीस दलात कुणीही सिंघम नाही

मुंबई पोलीस दलात कुणीही सिंघम नाही

Subscribe

विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती अ‍ॅक्शन मोडमध्ये

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी गुरुवारी मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी एक ट्विट केले. मुंबई पोलीस दल ही एक टीम आहे. येथे कोणीही सिंघम नाही, असे देवेन भारती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट करून देवेन भारती यांनी एकप्रकारे मुंबई पोलीस दलातील मनमानी कारभार करणार्‍या काही अधिकार्‍यांना सूचक इशारा दिल्याचे म्हटले जात आहे. शिवाय देवेन भारती यांच्या अंतर्गत कामकाज कसे चालेल याची चुणूकदेखील दाखवून दिली आहे.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील पोलीस अधिकारी असलेले देवेन भारती यांच्यासाठी गृह विभागाने खास विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली आहे. हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे आहे. त्यानुसार देवेन भारती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अंतर्गतच काम करणार असले तरी कायदा- सुव्यवस्था, गुन्हे, आर्थिक गुन्हे शाखा, प्रशासन आणि वाहतुकीची जबाबदारी सांभाळणार्‍या पाचही पोलीस सहआयुक्तांच्या कामावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देवेन भारती यांच्याकडे असणार आहे. या निर्णयाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची एकप्रकारे कोंडी करण्यात आल्याची चर्चा पोलीस दलामध्ये सुरू आहे.

- Advertisement -

दुहेरी सत्ताकेंद्र तयार होतील
पुण्यात गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना मुंबईच्या नव्या विशेष पोलीस आयुक्तपदाबाबत प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर बोलताना दोन पोलीस आयुक्तांमुळे मुंबईत दुहेरी सत्ताकेंद्र तयार होतील. त्यामुळे कनिष्ठ अधिकार्‍यांमध्ये नेमके कोणाचे आदेश पाळायचे याबाबत गोंधळ निर्माण होईल. शेवटी सरकारला जे पाहिजे ते बेछूटपणे करतात, असे वळसे-पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -