घरताज्या घडामोडीVaccination : बेस्ट बस प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र गरजेचे, अंमलबजावणी सुरू

Vaccination : बेस्ट बस प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र गरजेचे, अंमलबजावणी सुरू

Subscribe

मुंबईतील प्रवासाची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसेसमध्ये प्रवासासाठीची नवीन नियमावली बेस्ट परिवहन उपक्रमामार्फत अंमलात आली आहे. आज सोमवारपासूनच ही नियमावली प्रवासासाठी लागू होणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवरही बेस्ट उपक्रमाची ही नवीन नियमावली उपयुक्त ठरणार आहे. त्यानुसार प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपले लसीकरण पुर्ण झाल्याचा प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीचाच हा एक भाग आहे. त्यानुसार लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच बेस्ट बसमध्ये प्रवेश मिळणार असल्याचे उपक्रमाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडून शनिवारी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लसीकरण पुर्ण न झालेल्यांना दंडात्मक कारवाईची नियमावलीही राज्य सरकारने जाहीर केली आहे.

याआधी रविवारीच बेस्टच्या सर्व वाहकांना व्यवस्थापनाकडून ग्राऊंड स्टाफला तसेच तिकिट तपासणीस यांना बसमध्ये फक्त लसीकरण पुर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच बेस्टच्या एसी आणि नॉन एसी बसेसमध्ये लसीकरणानंतर १४ दिवस पुर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळणार आहे. सध्या एसी बसेसच्या बाबतीत स्टॉपवर असणाऱ्या प्रवाशांना ग्राऊंड स्टाफकडूनच तिकिट देण्यात येतात. त्यावेळी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तपासूनच तिकिट देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे युनिवर्सल पास किंवा कोरोनाचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच प्रवेश देण्यात येईल असे बेस्टकडून सांगण्यात आले. प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्राची कॉपी दाखवून प्रवास करता येईल.

- Advertisement -

राज्य सरकारची नियमावली लागू

राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. तिकोट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे,कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

लसीकरण प्रमाणपत्र गरजेचे

राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले ‘कोविन प्रमाणपत्र देखील’ त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल.१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकोय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायोकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे. कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.


Omicron Variant: राज्य मंत्रिमंडळाने बोलावली तातडीची बैठक; शाळा सुरू करण्याचा फेरविचार अन् निर्बंधांचीही शक्यता

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -