घरताज्या घडामोडीOmicron Variant: राज्य मंत्रिमंडळाने बोलावली तातडीची बैठक; शाळा सुरू करण्याचा फेरविचार अन्...

Omicron Variant: राज्य मंत्रिमंडळाने बोलावली तातडीची बैठक; शाळा सुरू करण्याचा फेरविचार अन् निर्बंधांचीही शक्यता

Subscribe

ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जगातील प्रत्येक देशाची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे आता देशातील अनेक राज्यांनी ओमिक्रॉन व्हेरियंटच्या अनुषंगाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्याच या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाका, असे निर्देश मुंबईसह सर्व जिल्ह्या प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करून झाल्यानंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत, असे म्हटले जात आहे. शिवाय आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे. तसेच ओमिकॉनच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता शाळा सुरू करण्याच्या वाटेवर ओमिक्रॉनमधेच आला आहे. ओमिक्रॉनमुळे शाळा सुरू कऱण्याचटा निर्णय पुन्हा एका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता आहे. कारण ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता पुन्हा काही निर्बंध लागू होऊ शकतात.

- Advertisement -

दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंबंधित प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागातर्फ आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासमोर आज सादर होणार आहे. पण आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भात जो निर्णय होणार आहे, त्यानुसार आयुक्तांकडून मुंबईतील महापालिका शाळेसंबंधित निर्णय घेतला जाणार आहे.


हेही वाचा – Omicron Variantची काय आहेत लक्षणे? दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांचा खुलासा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -