घरमुंबईकाळाचौकीत झाड पडून एकाचा मृत्यू; दोन जखमी

काळाचौकीत झाड पडून एकाचा मृत्यू; दोन जखमी

Subscribe

काळाचौकी अभ्युदय नगर येथील शिवाजी विद्यालयाजवळ शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास झाड कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. यापैकी ४५ वर्षीय चप्पल विक्रेते नथुलाल चुनालाल मौर्या यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या शोएब फरीद शेख व सुहास पालकर यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयात स्पष्ट केले.

मुंबईत जुलै महिन्यांमध्ये झाड पडून लोकांचे बळी जाण्याचे सत्र काहीस थांबलेले असतानाच शुक्रवारी पावसाच्या गैरहजेरीत काळाचौकीतील शिवाजी विद्यालयाशेजारील भेंडीचे झाड पडले. शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. म्हाडाच्या पाण्याची टाकी आणि पंपिंग स्टेशनवर कोसळले. त्याशेजारी मौर्या यांचा चप्पल दुरुस्ती आणि विक्रीचा स्टॉल्स होता. त्यावरच हे झाड पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोर्या हे कुर्ला पूर्वेला राहणारे होते.

- Advertisement -

हे झाड म्हाडाच्या इमारतीच्या आवारातील होते, असे स्थानिक शिवसेना नगरसेवक दत्ता पोंगडे यांनी स्पष्ट केले. हे झाड पडेल असे वाटत नव्हते. हे झाड पडल्यानंतर दोन पादचारी जखमी झाले होते. तर मोर्या यांच्या अंगावरच हे झाड पडल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात दाखल केले असता मौर्या यांना मृत घोषित केले. यासंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पावसाच्या सुरुवातीलाच झाडे पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील तीन घटना या केवळ शहर भागातील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -