घरमहाराष्ट्रराजकारण सोडून शेती-उद्योग कर; अजित पवारांचा मुलाला सल्ला

राजकारण सोडून शेती-उद्योग कर; अजित पवारांचा मुलाला सल्ला

Subscribe

अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी पक्षात कुणाशीही चर्चा केलेली नाही. मात्र त्यांनी आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली असल्याचे पवार म्हणाले. “साहेबांनी अनेक वर्ष लोकांसाठी काम केले आहे. शिखर बँकेत ते कधीही कोणत्याही पदावर काम करत नव्हते. तरिही त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत. राजकारणाची पातळी आता घसरली आहे. काकांसारख्या व्यक्तीला जर या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर तू राजकारणात जाऊ नकोस, त्यापेक्षा शेती आणि उद्योगाकडे लक्ष दे, असा सल्ला अजित पवार यांनी आपल्या मुलाला दिला.” अशी माहिती शरद पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.

आमच्यात मतभेद नाहीत – शरद पवार

अजित पवारांचा राजीनामा आणि पवार कुटुंबीय कलह याचा कोणताही संबंध नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमवरून माझी आणि अजित पवार यांची परस्पर विरोधी भूमिका होती. मात्र दोन व्यक्तींमध्ये मतभेद असतात, ते नैसर्गिक असते, असे पवार म्हणाले. पवार कुटुंबीयात यत्किंचितही वाद नाहीत. आमच्या कुटुंबात कुटुंब प्रमुखाचा निर्णय अंतिम मानला जातो, त्याचा सन्मान इतर सदस्य राखतात. आधी माझ्या मोठ्या बंधुना तो मान होता. त्यांच्यानंतर माझ्या शब्दाचा कुटुंबात आदर केला जातो, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -