घरमुंबईमत भविष्य घडवू , बिघडवू शकते

मत भविष्य घडवू , बिघडवू शकते

Subscribe

भिनेता-मंगेश देसाई…

माझ्या एका मताची ताकद काय आहे हे मला कळून चुकलेले आहे. तुमचे एक मत फक्त एका उमेदवाराचे भविष्य घडवू शकते तसे बिघडवूही शकते. सामुहिकपणे काम करणार्‍या पक्षालासुद्धा या एका मताचा हादरा बसू शकतो. आताचा मतदार चोखंदळ झालेला आहे. त्याला जे वाटते तो ते मतदानातून व्यक्त करतो.

- Advertisement -

मागच्या सरकारने तुम्हाला अपेक्षीत असे काम केले नसेल तर आणि केले असेल तर हिच संधी आहे त्यांना डावलण्याची किंवा पुन्हा काम करायला प्रवृत्त करण्याची. त्यामुळे मतदान करायला पाहिजे या मताचा मी आहे. पूर्वी अन्न-वस्त्र-निवारा ही माणसाची गरज होती. आता हा माणूस अन्न आणि निवारा यांच्यापुरता मर्यादीत राहिलेला आहे. वस्त्र तो आता कुठूनही उपलब्ध करू शकतो. पाण्याचा प्रश्न का सुटत नाही, दिवसेंदिवस घराची समस्या का भेडसावते याचे कारण मला अद्याप कळलेले नाही. जी एस टी लागू केला त्याचा फायदा अद्याप सामान्य माणसांपर्यंत पोहोचलेला नाही.

भारतातील प्रत्येक नागरिकाच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यातूनही कलाकाराकडे सरकारचे फारच दुर्लक्ष झालेले आहे. सरकारी कोट्यातून दहा टक्के आरक्षणातून मिळणार्‍या सदनिका, कलाकारांचे पेन्शन, अनुदानाविषयी असलेली नाराजी, जी नाट्यगृहे बंद पडलेली आहेत तिथे चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे मुद्दे मांडण्यात आले होते त्याचे काय झाले असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -