घरमुंबईअंधेरी पोटनिवडणुकीत आमचाच उमेदवार जिंकणार; उदय सामंतांचा दावा

अंधेरी पोटनिवडणुकीत आमचाच उमेदवार जिंकणार; उदय सामंतांचा दावा

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांच्या उमेदवारांपैकी आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा करण्यात येत आहे.

अंधेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर ते पद रिक्त झाले. दरम्यान अंधेरी विधानसभेची पोटनिवडूक जाहीर झाली आहे . या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. (Our own candidate will win in Andheri by-election; Claim of Uday Samantha)

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना दिलासा आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे मात्र बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाने या निवडणुकीतून माघार घेतली असून भाजपचे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मुरजी पटेल यांना समर्थन दर्शविले आहे. अशातच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचा उमेदवारच या निवडणुकीत जिंकेल असा विश्वास राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांच्या उमेदवारांपैकी आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, ‘आमचाच उमेदवार निवडून येईल. या निवडणुकीसाठी आम्ही कशापद्धतीने तयारी केली, उमेदवार निवडून आणण्यासठी कशापद्धतीने जोर लावला जाईल हे समोरच्याला कळेल. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार आम्ही उभा करणार आहोत. मुरजी पटेल हे आमचे उमेदवार आहेत. अंधेरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही उमेदवार आणि पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


हे ही वाचा – काँग्रेसची धुरा सुरक्षित ‘हातात’ जायला हवी; मनीष तिवारींकडून खर्गेंचे कौतुक

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -