घरCORONA UPDATECorona Update : दिलासादायक! मुंबईतील रूग्ण रिकव्हरी रेट ८१ टक्क्यांवर

Corona Update : दिलासादायक! मुंबईतील रूग्ण रिकव्हरी रेट ८१ टक्क्यांवर

Subscribe

मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत १ हजार १३४ नव्या रूग्णांची वाढ झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र एका दिवसांत तब्बल १ हजार १०१ जणांनी कोरोनावर मात केली असून मुंबईतील रिकव्हरी रेट हा ८१ टक्क्यांवर आला आहे. मुंबई आतापर्यंत १ लाख ३५ हजार ३५७ इतके कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १८ हजार २९८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर एकूण १ लाख ०९ ३६९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ७ हजार ३८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

तसेच राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार ४९२ नव्या रूग्णांची भर पडली असून २९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ६१ हजार ९४२ इतकी झाली आहे. तर ४ लाख ८० हजार ११४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१ हजार ९९५ इतकी झाली असून मृत्यूदर ३.२७ टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा –

ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी BMCच्या ‘या’ हॉस्पिटलमध्ये ३२० जणांवर होणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -