घरमुंबईपनवेल उपजिल्हा हॉस्पिटल तज्ज्ञ डॉक्टरांविना; वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही वानवा

पनवेल उपजिल्हा हॉस्पिटल तज्ज्ञ डॉक्टरांविना; वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही वानवा

Subscribe

पनवेल उपजिल्हा रुग्णालय सुरु होऊन अवघा दीड महिना उलटला आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबत त्रुटी वारंवार समोर येत आहेत.

पनवेल उपजिल्हा रुग्णालय सुरु होऊन अवघा दीड महिना उलटला आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबत त्रुटी वारंवार समोर येत आहेत. सद्यस्थितीत तर पनवेल उपजिल्हा रुग्णालयालाच डॉक्टरांची नितांत गरज असल्याची बाब समोर आली आहे. संपूर्ण पनवेल तालुक्यातील नागरिकांना आपले हक्काचे असे सुसज्ज असे रुग्णालय मिळाले, मात्र सोयीसुविधांची याठिकाणी वानवा होत असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. किरकोळ शस्त्रक्रियांपासून अवघड शस्त्रक्रिया करण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध नाही.

गेल्या आठवड्यातच वैद्यकीय अधीक्षक नागनाथ येमपल्ले यांनी हाडांची शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली असली तरी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये डोळ्याचे डॉक्टर, हाडांचे डॉक्टर, लहान मुलांचे डॉक्टर, भूल देणारे डॉक्टर आणि पीएम करणारे डॉक्टर उपलब्ध आहेत. मात्र गायनाईक लॉजिस्ट, सर्जन आणि मेडिसिन डॉक्टरांची या ठिकाणी कमतरता पाहावयास मिळत आहे. परिणामी मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना दुसऱ्या अन्य रुग्णालयांमध्ये पाठवावे लागत आहे अथवा एक दिवस ठरून अन्य रुग्णालयातील डॉक्टरांना याठिकाणी बोलाविण्याची कसरत करावी लागत आहे.

- Advertisement -

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पाठोपाठ नर्सचीही कमतरता पाहावयास मिळत आहे. रुग्णालयासाठी एकूण ३० नर्सची गरज असताना अवघ्या १५ नर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात तर झाली मात्र सर्व रुग्णांना योग्य वेळ देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत होत आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालय सुरु होण्या अगोदरपासून ते सुरु झाल्यानंतरही येथील समस्या संपण्याचे नाव काढत नाही. याठिकाणी शवविच्छेदन खोली ही तळमजल्यावर असल्यामुळे आणि एक्सओस फॅनचा वापर न केल्याची वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये बदलावं करून त्याठिकाणी एक्सोस लावण्यात आले. त्यानंतर पाण्याच्या टाक्या उघड्या ठेवून प्रशासन रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचेही समोर आले. याच उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रवेशद्वारावरील लिफ्ट बंद असल्याचे समोर आल्यामुळे नागरिकांची यामुळे गायीसोय होत होती. याठिकाणी अवघ्या दीड महिन्यातच रुग्णालयाच्या बाथरूमच्या खोल्यांमध्ये दरवाजांना कडी कोयंडे नसल्याची बाबही समोर आली. असे एक ना अनेक प्रश्नांनी उपजिल्हा रुग्णालय घेरले असल्यामुळे वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या सोयी पुरवल्या जाव्यात तसेच आरोग्य विभागामार्फत याठिकाणी डॉक्टर्स आणि नर्सची असलेली कमतरता यावर उपाय शोधावा, जेणेकरून रुग्णांची हेळसांड होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा –

सत्तास्थापनेवर मी प्रतिक्रिया देणार नाही – देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -