घरमनोरंजन'अग्गबाई सासूबाई' मधील मॅडीचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता!

‘अग्गबाई सासूबाई’ मधील मॅडीचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता!

Subscribe

भक्ती रत्नपारखीने आजपर्यंत अनेक चित्रपटात आणि नाटकात कामं केली आहेत. पण भक्तीने साकारलेली मॅडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सध्या अग्गबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिया झाली आहे. या मालिकेतील सगळेच कॅरेक्टरने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच घरं केलं. अभिनेत्री निवेदीता सराफ, तेजश्री प्रधान आणि गिरीश ओक या कलाकारांबरोबर मालिकेतील इतर नवीन कलाकारांची कामं देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. म ती बिल्डींगमधली प्रज्ञा असो वा अभिजीत राजेंच्या हॉटेलमध्ये काम कराणारी मॅडी असो. नुकताच मॅडीला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. पण तुम्हाला माहितेय का ही मॅडी नेमकी कोण आहे. या अभिनेत्रीचं खरं नाव आहे, भक्ती रत्नपारखी. भक्ती रत्नपारखीने आजपर्यंत अनेक चित्रपटात आणि नाटकात कामं केली आहेत. पण भक्तीने साकारलेली मॅडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

- Advertisement -

या आधी भक्तीला आपण कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हा कॉमेडी शोमध्ये बघीतले होते. या शो मधील तीचा कॉमेडी सेन्सबघून तीची ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत मॅडीच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. भक्तीने या आधी अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत ‘ओह माय गॉड’ या चित्रपटात काम केले आहे. या सोबतच तिने ‘सी कंपनी’, ‘देऊळ’ ह्यासारख्या लोकप्रिय चित्रपटांत काम केले आहे. भक्तीची आणखी एक ओळख सांगायची म्हणजे भक्ती रत्नपारखी हि मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते निखिल रत्नपारखी यांची पत्नी आहे. निखिल रत्नपारखी यांनी ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई कि लव्हस्टोरी’ ह्यासारख्या हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ ह्यासारख्या मराठी चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर निखील अनेक जाहीरांतीमधून घराघरात पोहचला आहे.

View this post on Instagram

निवेदिता सराफ….लहानपणापासून मी यांचं काम बघत आले. आत्ताच त्याच 'वाडा' या नाटकातल अप्रतिम काम मला खरच खूप मनापासून आवडलं…तेव्हा मला यांच्याबरोबर काम करायला मिळू शकेल अस वाटलंच नव्हत… अग्गबाई सासूबाई च्या Audition ला जेव्हा मी गेले..आणि तेव्हा निवेदिता मॅम ने …तुच हे मॅडी character करणार..आणि खुप छान करणार..अस सांगितले..आंणि माझा confidence वाढवला..त्याबद्दल मी काय बोलू…तिच्या बद्दल चा आदर खुपच वाढला.. आणि ती कधी माझी निवेदिता ताई झाली हे मला कळलं च नाही…अजून खुप काही आहे तिच्याबद्दल….सांगेन हळूहळू…love you Tai?? अग्गबाई सासूबाई…zee Marathi..8.30 PM..Every Monday to Saturday ???… #verymuchexited #lovelycharacters #grtactors @zeemarathiofficial @aggabaisasubai

A post shared by Bhakti Ratnaparkhi (@bhakti_ratnaparkhi) on

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी भक्तीने सोशलमिडीयावर एक पोस्ट लिहीली होती. अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्याविषयी ही पोस्ट होती. त्यात तिने लिहिलं होतं कि मी लहानपणापासूनच निवेदिता जोशींचे काम बघत आलेली आहे. मला त्यांच्यासोबत काम करायला मिळू शकेल असं जराही वाटलं नव्हतं. ‘अग्गबाई सासूबाई’ च्या ऑडिशनला जेव्हा मी गेले तेव्हा निवेदिता मॅडमने ‘तूच हे मॅडी कॅरॅक्टर करणार आणि खूप छान करणार’ असे मला सांगितले, तेव्हा माझा आत्मविश्वास खूप वाढवला. तिच्या बद्दलचा आदर अजूनच वाढला. काम करता करता ती माझी निवेदिता ताई कधी झाली हे मला सुद्धा कळलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -