घरमुंबईयंत्रणांच्या दुर्लक्ष, उदासीनेचा परिणाम

यंत्रणांच्या दुर्लक्ष, उदासीनेचा परिणाम

Subscribe

भिवंडीतील एसएससी पेपरफुटी प्रकरण

भिवंडी परिसरात माध्यमिक परीक्षा मंडळाच्या एसएससी प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाल्यावर या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले आहे. सोबतच पेपर फुटल्याच्या सुरुवातीलाच या प्रकरणाची तक्रार दिल्यानंतर त्याची परीक्षा मंडळाने वेळीच पुरेशी दखल न घेतल्याने पेपरफुटीचे पुढील प्रकार सुरू राहिल्याचे समोर आले आहे.

या गुन्ह्यातील घटनाक्रम पाहिल्यास ११ मार्च रोजी बीजगणित चा पेपर सुरु होण्याच्या दोन तास आधीच एका पालका कडून एका हुशार शिक्षकाकडे प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यासाठी व्हॉट्सअप केल्याचे समोर आले होते. त्यानंतर संबंधित पालकाने शिक्षकावर दबाव टाकल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवून दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा 13 मार्च रोजी भूमिती विषयाची प्रश्नपत्रिकासुद्धा अशाच पद्धतीने फुटली होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीने हे बेकायदा आणि गुन्ह्याचे कृत्य असल्याने उत्तर लिहून देण्यास नकार दिला. या प्रकरणातील संबंधित शिक्षकाने संवाद फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडेे 14 मार्च रोजी आपली कैफियत मांडत हे गैरकृत्य समोर आणण्यासाठी मदत मागितली.

- Advertisement -

संवाद फाऊंडेशनचे प्रमुख गोविंद शर्मा यांनी त्याच दिवशी सायंकाळी बीजगणित आणि भूमिती विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे पुरावे राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, पोलीस उपायुक्त यांच्याकडे ईमेल द्वारे तात्काळ पाठवून दिले होते. तसेच या बाबत कारवाई करण्याची मागणी केल्याचे शर्मा यांनी सांगितले. मात्र त्याची योग्य आणि तात्काळ दखल घेतली गेली नाही, असा आरोपही शर्मा यांनी केला आहे. त्यानंतर 15 आणि 18 मार्च रोजीचे अनुक्रमे विज्ञान व तंत्रज्ञान 1 व 2 या दोन्ही विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटल्या. त्या त्या वेळी मी याबाबतची माहिती संबंधितांना इ मेलद्वारे कळवली असल्याचे शर्मा यांनी सांगितले. त्यानंतर शहरात परीक्षा मंडळाचे भरारी पथक आणि अधिकारी आले मात्र चौकशी करून कारवाई न करता निघून गेले. पुढे 20 मार्च रोजी इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी माध्यमांनी दखल घेतल्यावर परीक्षा मंडळाने घाईघाईत 20 मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात तर काल्हेर येथील प्रकरणी पी.डी. टावरे विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश भोईर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी अजूनपर्यंत चार जणांना भिवंडीतील दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केली असून त्यापैकी एक जण हा शाळेचा शिक्षक असून इतर तिघे हे खाजगी कोचिंग क्लास चालविणारे आहेत. विशेष म्हणजे ज्या परीक्षा केंद्रावरील शिक्षक मुख्य परीक्षा केंद्रात जाऊन प्रश्नपत्रिका ताब्यात घेत होता त्याने हे गैरकृत्य केले असून त्यापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात अजून यश आले नाही. परीक्षा मंडळाने तातडीने पावले उचलीत 14 मार्च रोजी आलेल्या तक्रारीची दाखल वेळीच घेतली असती तर पुढील बेकायदा प्रकार टाळता आला असता अशी प्रतिक्रिया गोविंद शर्मा यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -