घरठाणेलोकलच्या विलंबामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासी त्रासले, नियोजित वेळेत इच्छितस्थळी पोहोचणे होतेय अशक्य

लोकलच्या विलंबामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासी त्रासले, नियोजित वेळेत इच्छितस्थळी पोहोचणे होतेय अशक्य

Subscribe

कामाच्या ठिकाणी वेळेवर जाण्यासाठी मुंबई लोकलमधून प्रवास करणे हे अत्यंत सोयीचे ठरते. परंतु ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना मात्र लोकलमधून प्रवास करणे हे अनेकदा त्रासदायक ठरत असल्याचे पाहायला मिळते.

ठाणे : मुंबईत नोकरी करताना वेळेचे गणित पाळणे हे अत्यंत गरजेचे असते आणि हे वेळेचे गणित पाळण्याकरिता मुंबईतील लोकलचा महत्त्वाचा वाटा आहे. कारण कामाच्या ठिकाणी वेळेवर जाण्यासाठी मुंबई लोकलमधून प्रवास करणे हे अत्यंत सोयीचे ठरते. परंतु ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना मात्र लोकलमधून प्रवास करणे हे अनेकदा त्रासदायक ठरत असल्याचे पाहायला मिळते. कारण वारंवार मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा फटका हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. ठाणे स्थानकाच्या पुढे मध्य रेल्वेचे वेळापत्रक हे कायमच कोलमडलेले पाहायला मिळते. ज्यामुळे ठाण्याच्या पुढून येणारे प्रवासी मात्र यामुळे त्रासले आहेत. (Passengers on Central Railway were frustrated due to local delays)

हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री, दिवाळीपूर्वी भाजीपाल्यांच्या दरात वाढ

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या गाड्या या नेहमीच किमान 10 मिनिटे उशीराने धावताना पाहायला मिळतात. त्यामुळे वेळापत्रक बिघडल्याने पुढील वेळापत्रक बिघडलेले राहते. तर, मुंबईतील एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकल गाडीचे नियोजन करून प्रवास सुरू केला, तर ठरलेल्या वेळेच्या एक ते दीड तास उशिराने पोहोचण्याची शक्यता निर्माण होते. महत्त्वाची बाब म्हणजे विमानतळावर विमान पकडण्यासाठी जाणाऱ्यांना या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा मोठा फटका बसल्याचे सातत्याने समोर येत आहे. परिणामी, अनेकजण आधीची लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात. तरी गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने त्याचाही फटका बसतो. लोकल विलंबामुळे नोकरी, व्यवसायवरही याचा परिणाम होत असल्याची माहिती या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकांची निर्मिती झाल्यानंतर शंभराहून अधिक लोकल फेऱ्या वाढवण्याचा दावा करण्यात आला होता. पण या मार्गिकांची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा रेल्वेची क्षमता वाढवण्याऐवजी रेल्वेच्या आधीच्या वक्तशीरपणामध्ये अडथळे निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान तयार करण्यात आलेल्या मार्गिकेची निर्मिती होण्याआधी जलद गाड्या पारसिक बोगद्यातून पुढे जात होत्या. त्यामुळे या गाड्यांचा वेळ पाच ते दहा मिनिटांनी वाचत होता. परंतु आता जलद गाड्याही कळवा, मुंब्रा दिवा स्थानकांतून जात असल्यामुळे त्यांचे वेळापत्रक ढासळले आहे. त्यामुळे आता कोलमडलेले वेळापत्रक नीट करण्यासाठी ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या शटलमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -