घरमहाराष्ट्रशरद पवारांनंतर सुशीलकुमार शिंदेंनीही दौरा केला रद्द; पंढरपुरातील मविआची सभा पुढे ढकलली

शरद पवारांनंतर सुशीलकुमार शिंदेंनीही दौरा केला रद्द; पंढरपुरातील मविआची सभा पुढे ढकलली

Subscribe

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, शरद पवार यांचा दौरा का पुढे ढकलला याची मला माहिती नाही, पण ही बैठक एकत्रित होती त्यामुळे जर ते नसतील तर मी देखील जाणार नाही, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

पंढरपूर: पंढरपूर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक होणार होती. परंतु शरद पवार यांनी अचानक दौरा रद्द केला. शरद पवार यांचा आज माढा आणि सोलापूर दौरा होणार होता. मात्र अचानक त्यांचा हा दौऱा रद्द झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पंढरपूर येथे सभा होणार होती. त्यासाठी शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र, शरद पवार यांनी दौरा रद्द केल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीदेखील त्यांचा पंढरपूर दौरा रद्द केला आहे. (After Sharad Pawar Sushil Kumar Shinde also canceled his tour MVA meeting in Pandharpur postponed)

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, शरद पवार यांचा दौरा का पुढे ढकलला याची मला माहिती नाही, पण ही बैठक एकत्रित होती त्यामुळे जर ते नसतील तर मी देखील जाणार नाही, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

- Advertisement -

…म्हणून होणार होती बैठक

सोलापूर लोकसभा हा काँग्रेसचा मतदारसंघ असून यंदा येथून आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तर माढा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ असल्यानं येथील उमेदवारीबाबत चाचपणी होणार आहे. सध्या हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून मढ्यातील शरद पवार यांचे सहकारी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चाचपणी होणार होती.

माढा विधानसभेचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे हे दोन्ही बंधू अजित पवार गटात असून फलटणचे रामराजे निंबाळकर, माळशिरसाचे उत्तम जानकर यांनीही अजित पवार यांना साथ दिल्यानं सध्या शरद पवार यांच्याकडे लोकसभेसाठी उमेदवार नाही. यातच माढा लोकसभेसाठी शिवसेनेकडून ( ठाकरे गट) धनगर नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नावाची चर्चा सुरू असून या मतदारसंघात जवळपास सहा लाख एवढ्या संख्येने धनगर समाज असल्यानं ही जागा शिवसेनेला देण्याबाबत शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत सोलापूर आणि माढा लोकसभेबाबत विचार होणार होता.

- Advertisement -

(हेही वाचा: अब्दुल सत्तार चले जाओ! गावकऱ्यांनी सत्तारांविरोधात केली घोषणाबाजी, कारण काय?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -