घरमुंबईडॉ. आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडे काढण्यास परवानगी

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडे काढण्यास परवानगी

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर इंदू मिलमधील स्मारक उभारण्याच्या कामात आड येणारी ११६ झाडे काढण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. यामुळे इंदूमिलमधील झाडे काढून त्या जागी स्मारकाचे बांधकाम करणे शक्य होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर इंदू मिलमधील स्मारक उभारण्याच्या कामात आड येणारी ११६ झाडे काढण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. यामुळे इंदूमिलमधील झाडे काढून त्या जागी स्मारकाचे बांधकाम करणे शक्य होणार आहे. मिल परिसरातील काढलेली झाडे त्याच भूखंडावर किंवा मनोरंजन मैदानात लावली जाणार आहेत. दादर युनायटेड मिल नं ६, इंदू मिलच्या भूखंडावर ११. ४ एकर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे.

२५० मधील ११६ झाडे काढावी लागणार

या जागेवर एकूण २५० विविध प्रकारची झाडे आहेत. यात आंबा, शेवगा, सोनमोहोर, फणस, गुलमोहोर, रामफळ, पिंपळ अशा झाडांचा समावेश आहे. २५० मधील ११६ झाडे काढावी लागणार असून १३४ झाडे आहे तिथेच राहणार आहेत. स्मारकाच्या कामासाठी भूखंडावरील झाडे काढावी लागणार आहेत. एमएमआरडीएने ही झाडे काढण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे परवानगी मागितली होती. या प्रस्तावाला गुरुवारी वृक्षप्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -

पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे लावण्यायाच्या अटीवर झाडे काढण्यास परवानगी 

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने ही जागा डॉ. आंबेडकर स्मारकासाठी राज्य सरकारला हस्तांतरीत केली आहे. स्मारकाच्या उभारणीचे काम सुरु करण्यापूर्वी झाडे काढण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. पालिका प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसाार ही झाडे काढण्यापूर्वी हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहिरात दिली होती. वृक्षप्राधिरणाच्या नियमावलीनुसार झाडे कापण्याच्या बदल्यात नवीन झाडे त्याच भूभागावरील मोकळ्या जागेत किंवा मनोरंजन मैदानात ३० दिवसात लावण्यात येणार आहेत. नवीन लावण्यात येणाऱ्या झाडांची उंची १५ फूटापेक्षा व घेर १ फूटापेक्षा कमी नसावी तसेच पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे त्याच भूभागावर लावावीत या अटीवर ही झाडे काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -