घरमुंबईठाणेकरांचे कोट्यवधी खड्ड्यांत!

ठाणेकरांचे कोट्यवधी खड्ड्यांत!

Subscribe

ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरातील खड्डे भरण्यासाठी दरवर्षी पालिकेकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, खड्ड्यांचा प्रश्न कायम असून कंत्राट घेणार्‍या कंपन्यांचे उखळ पांढरे झाले आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरातील खड्डे भरण्यासाठी दरवर्षी पालिकेकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, दरवर्षी खड्ड्यांचा प्रश्न आहेच. आतापर्यंत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खड्डे भरण्यासाठी महापालिकेने मागील काही वर्षात कोट्यवधींचा चुराडा केला आहे. मात्र, खड्ड्यांचा प्रश्न कायम असून कंत्राट घेणार्‍या कंपन्यांचे उखळ पांढरे झाले आहे. ठाणे महापालिकेने यंदाच्या वर्षी खड्डे भरण्यासाठी २ कोटी रूपयांची तरतूद केली. मागील वर्षी ४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा शहरात कमी खड्डे पडतील, असा प्रशासनाचा दावा असल्याने कमी तरतूद करण्यात आली. सध्या ठाणे शहरातील कोपरी बस स्टॅाप, साकेत रोड चरई, राम मारूती रोड, आनंदनगर पूर्व भाग, माजीवडा, वाघबीळ, इंदिरानगर आणि लोकमान्यनगर आदी परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कोपरी बस स्टॉपवरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

स्टार ग्रेड अ‍ॅप

खड्डे बुजविण्यासाठी ठाणे महापालिकेने स्टार ग्रेड अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपवर केवळ खड्ड्यांच्या तक्रारी करता येणार नाहीत तर शौचालय गार्डन, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रदूषण, अग्निशमन आदी विभागाचा यात समावेश करण्यात आला. हे अ‍ॅप एक ते दोन दिवसांत सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. डोंबिवलीतून कल्याणकडे जाणार्‍या रस्त्याला खड्डे पडले आहेत. टिळकपुतळा ते मंजुनाथ शाळा या रस्त्याची चाळण झाली. अवघ्या महिनाभरापूर्वीच हा रस्ता बनवण्यात आला होता. कल्याणातही अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. केडीएमसीने खड्डे भरण्यासाठी यंदाच्या वर्षी १३ कोटी ६० लाखांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने जेट पॅचर आधुनिक प्रणाली, ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान आदींचा वापर केला आहे. केडीएमसी हद्दीत ३२ किमीचे सिमेंट काँक्रीटकरणाचे रस्ते आहेत. मात्र डांबरीकरण असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करूनही परिस्थिती जैसे थे आहे.

- Advertisement -

रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी गेल्यावर्षीपेक्षा यंदा कमी तरतूद करण्यात आली. शहरात किती खड्डे पडलेत, त्याची माहिती पालिकेचे इंजिनिअर स्वत: जाऊन पाहणी करीत आहेत. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी पालिकेने कॉन्ट्रक्टर नेमले आहेत. पावसाची उघडीप मिळाल्यानंतर कामास सुरुवात होईल.
-अनिल पाटील, नगरअभियंता, ठाणे महापालिका

महापालिका                               यंदाच्या वर्षातील तरतूद                              मागील वर्षातील तरतूद

- Advertisement -

ठाणे महापालिका                               २ कोटी                                                  ४ कोटी
केडीएमसी                                       १३ कोटी                                                ६० लाख १२ कोटी

शहरात ३२ किमी सिमेंट रस्ते आहेत. अनेक वर्षे रस्त्यांची कामे केली नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यंदाच्या वर्षी १३ कोटी ६० लाखांची तरतूद केली असून, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.
प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, केडीएमसी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -