घरमुंबईपीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांना अटक

पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांना अटक

Subscribe

सारंग वाधवान आणि राकेश वाधवान या दोन व्यवस्थापकीय संचालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण दोघेही तपासात सहकार्य करत नसल्याच्या कारणावरुन पोलिसांनी आज, गुरुवारी दोघांनाही अटक केली.

पंजाब, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (पीएमसी बँक) घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी एचडीआयएल कंपनीवर कारवाई केली. कंपनीचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची ३५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाचही आणली आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ आणि एचडीआयएल कंपनीच्या प्रवर्तकांविरोधात खटला दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष तपासणी पथक याप्रकरणी तपास करत आहे.

आरबीआयच्या नियमांचा भंग 

आता निलंबित करण्यात आलेले पीएमसी बँकेत व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) एक पत्र लिहिले आहे. त्यात दिवाळखोर एचडीआयएल कंपनीला ६ हजार ५०० कोटींपेक्षा जास्त कर्ज दिल्याचे त्यांनी कबूल केले आहेत. पीएमसी बँकेची एकूण मालमत्ता ८,८८० कोटी रुपयांची असताना त्याच्या ७३ टक्के इतके कर्ज देऊन आरबीआयच्या नियमांचा भंग केल्याचे थॉमस यांनी मान्य केले आहे.

- Advertisement -

२३ सप्टेंबर रोजी आरबीआयने निर्बंध घातले

पीएमसी बँकेवर २३ सप्टेंबर रोजी आरबीआयने निर्बंध घातले. बँकेत अनियमितता आढळून आल्यामुळे घालण्यात आलेल्या या निर्बंधामुळे सहा महिन्यांपर्यंत बँकेच्या खातेधारकांना केवळ १० हजार रुपये काढण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे एकच हल्लकल्लोळ माजला. पीएमसी बँकेचे अध्यक्ष वारेयाम सिंग हे २००६ आणि २०१५ मध्ये एचडीआयएलच्या मंडळावर होते. त्यानंतर त्यांची पीएमसी बँकेत संचालक म्हणून नियुक्ती झाली. पुढे ते बँकेचे अध्यक्षही झाले. पीएमसी बँकेचे अधिकारी आणि एचडीआयएल कंपनीचे अध्यक्षांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९,४२०, ४६५, ४७१, १२० (ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -