घरमुंबईबुडीत कर्ज लपवण्यासाठी पीएमसीने वापरली 'ही' युक्ती

बुडीत कर्ज लपवण्यासाठी पीएमसीने वापरली ‘ही’ युक्ती

Subscribe

यासाठी हजारापेक्षा अधिक बनावट खात्यांचा वापर केल्याची माहिती जॉय थॉमस यांनी दिली.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेला बँकेचा एमडी जॉय थॉमस याने बँकेच्या घोटाळ्याबाबत धक्कादायक माहिती सांगितली आहे. त्याने सांगितल्यानुसार एचडीआयएल ला देण्यात आलेले ६ हजार ५०० करोड रुपयांचे कर्ज रिझर्व्ह बँकेपासून लपवण्यासाठी बँकेने हजारो बनावट खात्यांचा वापर केला. यासाठी हजारापेक्षा अधिक बनावट खात्यांचा वापर केल्याची माहिती जॉय थॉमस यांनी दिली.

थॉमस जॉय यांनी २१ सप्टेंबर रोजी सेंट्रल बँकेच्या सिनिअर पर्यवेक्षक अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “बनावट खात्यांची माहिती लपविल्याने दरवर्षी आरबीआयतर्फे करण्यात येणाऱ्या तपासणीत आम्हाला तणाव येत असे.” विशेष म्हणजे पीएमसीच्या बोर्ड आणि बँकेच्या निबंधकांना सुद्धा या बाबतीत अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती जॉय यांनी दिली.

- Advertisement -

एफआयआर दाखल

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआयच्या आदेशाने एचडीआयएलसह बँकेच्या दहा पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. ४ हजार ३३५ कोटींचा हा घोटाळा असल्याचे समोर आले आहे. बनावट खात्यांवर हा पैसा वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -