घरCORONA UPDATEपुण्याकडे शासनाचे दुर्लक्ष, चाचण्या झाल्या कमी; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

पुण्याकडे शासनाचे दुर्लक्ष, चाचण्या झाल्या कमी; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे शहरातील दौऱ्यावर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यांनी या शहराच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नायडू आणि ससून रुग्णालयांची पाहणी करणार आहेत. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार आहेत. दरम्यान. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत शासनाचे पुण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे म्हटले आहे. आवश्यक इतक्या चाचण्या पुण्यात झाल्या नसून कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

#Live – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

#Live – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदPowered by Restream https://restream.io/#Live – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, June 23, 2020

- Advertisement -

काय म्हणाले देवेंद्र फणडवीस 

आपल्या राज्यात दररोज ३८ हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. परंतू केवळ १४ हजार चाचण्याच केल्या जात आहे. ही अतिशय धोकादायक बाब आहे. जेव्हा कंटेटंमेंट झोन वाढतात तेव्हा जास्तीत जास्त चाचण्या होणे हाच त्यावरचा उपाय आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. कुणाला कमी लेखण्याची ही वेळ नाही. टीका करण्याची तर अजीबात नाही. पण, कुठे काही कमतरता राहत असेल तर ती निदर्शनास आणून देणे, हे आपले कर्तव्य आहे. आकडे कमी करण्याच्या नादात रणनीती चुकायला नको. संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. त्यातून रूग्ण ओळखता येतो आणि त्यातून इतरांना सावध करता येते. हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि तो जगाने स्वीकारला आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकांना मदत करावी. तसेच कोरोना संदर्भातील समस्या सोडवण्याच्या हेतून दौरा काढला जाणार असून उद्या सोलापूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

हेही वाचा –

ट्रम्प यांच्या एच १-बी व्हिसा निर्णयावर सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली नाराजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -