घरदेश-विदेशपर्वतावर मारा करणार्‍या बोफोर्स तोफांसाठी दारु गोळा जमविण्याची तयारी सुरू

पर्वतावर मारा करणार्‍या बोफोर्स तोफांसाठी दारु गोळा जमविण्याची तयारी सुरू

Subscribe

लडाखच्या गालवान खोर्‍यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात २० सैनिकांच्या बलिदानानंतर भारतीय सैन्यदल आता चीनला चांगलेच प्रत्यूत्तर देण्यासाठी तयारी करत आहे. सशस्त्र दलांसाठी अत्याधुनिक हत्यारांचे कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सुमारे ५०० कोटींच्या आपत्कालीन खरेदीस परवानगी दिली आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून ५० किलोमीटरच्या रेंजपर्यंत लक्ष्य करता येतील, अशा बोफोई (होवित्जर) तोफांसाठी दारु गोळा जमवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ऑर्डरही दिली आहे.

लडाखच्या गालवान खोर्‍यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात २० सैनिकांच्या बलिदानानंतर भारतीय सैन्यदल आता चीनला चांगलेच प्रत्यूत्तर देण्यासाठी तयारी करत आहे. सशस्त्र दलांसाठी अत्याधुनिक हत्यारांचे कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सुमारे ५०० कोटींच्या आपत्कालीन खरेदीस परवानगी दिली आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून ५० किलोमीटरच्या रेंजपर्यंत लक्ष्य करता येतील, अशा बोफोर्स (होवित्जर) तोफांसाठी दारु गोळा जमवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ऑर्डरही दिली आहे.

मागील वर्षी लष्कराने आर्थिक अधिकारांतर्गत पश्चिम भागात अधिक नुकसान करण्यासाठी अधिक मारक क्षमता असलेल्या शस्त्रास्त्रांना तैनात केले. सध्याचा तणाव लक्षात घेता आता सैन्य दलाला त्यांचे आर्थिक अधिकार परत देण्यात आले आहेत. आता उंच-उंच पर्वतांवर सहजपणे तैनात करता येणार्‍या अल्ट्रा-लाइट हॉवित्झर तोफांद्वारे वापरल्या जाणार्‍या बंदुकांच्या दारूगोळासाठी पुन्हा ऑर्डर देण्याचे ठरवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या आदेशानंतर आर्मीने ऑक्टोबरच्या अंतिम तारखेपर्यंत अमेरिकेतून दारूगोळा मिळण्यास सुरुवात झाली. पूर्व लडाख क्षेत्रासह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) चीनने त्यांच्या तोफा आणि शस्त्रे तिबेट व इतर सीमा भागात तैनात केल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

चीनला जसास तसे उत्तर मिळणार
विशेष म्हणजे भारतीय सैन्याने चीन सीमेवर अमेरिकन निर्मित एम ७७७ होवित्झर तोफ तैनात केले आहे. १९९९ साली कारगिल युद्धाच्या वेळी बोफोर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या होवित्झर तोफांनी पाकिस्तानला जेरीस आणले होते. यानंतर लवकरच दक्षिण कोरियाच्या के -९ वज्र तोफांनाही मैदानात उतरवले जाऊ शकते. यामुळे लडाखमधील भारतीय लष्कराच्या तोफखाना रेजिमेंट्सला नवी ताकद मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -