घरमुंबई'मरे'चा आज 'रविवार'; मध्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

‘मरे’चा आज ‘रविवार’; मध्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Subscribe

रविवारच्या वेळापत्रकानुसार रेल्वेसेवा सुरू असल्याने प्रवाशांचे झाले हाल

तब्बल १४ ते १६ तास बंद असलेली मध्य रेल्वेची सेवा कासवाच्या गतीने सुरू झाली, मात्र मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा बुधवारी सकाळीही कोलमडलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र पहायला मिळाले. आज मध्य रेल्वेकडून रविवारच्या वेळापत्रकानुसार अनेक लोकल्सच्या फेऱ्या रद्द करून लोकल सेवा सुरू आहे. मात्र या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे मोठे प्रमाणात हाल होऊन दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.

- Advertisement -

आज कामाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्याने प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होऊन धक्का बुक्कीचे देखील प्रकार घडले. रेल्वेने कमी फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.

रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक

सलग चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने, तिन्हा रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मंगळवारी जोरदार पावसाने रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने आज मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक असल्याने कमी प्रमाणात लोकल धावणार असल्याचे सांगितले जात आहे. जोरदार पावसाची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला असून रेल्वेने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

डोंबिवली स्थानकात महिलेला प्रसुतीवेदना; एका रुपयात महिलेची झाली डिलिव्हरी

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली असताना स्थानकात गाडीची वाट पाहत उभी असलेल्या जस्मीन शेख या महिलेस प्रसुती वेदना सुरू झाल्या. डोंबिवली स्थानकात एका गर्भवतीची सुखरूप प्रसुती करण्यात आली आहे. डोंबिवलीत वनरुपी क्लिनीकमध्ये जस्मीन यांना तातडीने दाखल करण्यात आले. डॉ. स्मिता उप्पड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे फक्त एक रुपया फी घेऊन ही प्रसुती केली. महिला व बाळ दोन्ही सुखरुप असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गर्दी कमी होण्यासाठी रेल्वेकडून विशेष लोकल

मुंबई आणि ठाण्यातील लोकल स्थानकांवर प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष जादा लोकलची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार डोबिंवली आणि ठाण्याहून मुंबई सीएसएमटीसाठी विशेष लोकल सोडण्यात येत आहेत.

प्रवाशांचे हाल पाहून मध्य रेल्वेला जाग

या प्रचंड गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्यात आलेली लोकल सेवा पुर्ववत नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करून अखेर प्रवाशांचे हाल पाहून मध्य रेल्वेला जाग आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -