घरताज्या घडामोडीमुंबईत पाऊस कमबॅक करणार

मुंबईत पाऊस कमबॅक करणार

Subscribe

गेल्या २४ तासांमध्येही मुंबईत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच तुरळक ठिकाणी अशा पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई तसेच शहराच्या परिसरातील भागात येत्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. येत्या ४८ तासांमध्ये ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या २४ तासांमध्येही मुंबईत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच तुरळक ठिकाणी अशा पावसाची नोंद झाली आहे.

काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरींचा वर्षाव होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबई वेधशाळेत सांताक्रुझ केंद्रात १२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर कुलाबा केंद्रात ०.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर येत्या ४८ तासांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शहरात कमबॅक होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईत आजही पावसाने विश्रांतीच घेतली. वेधशाळेने याआधीही मुंबईत पावसाची विश्रांती असेल असा अंदाज वर्तवला होता. तसेच विदर्भातील काही भागात मात्र पावसाचा जोर वाढेल असा इशारा दिला होता.

- Advertisement -

येत्या पाच दिवसांमध्ये उत्तर कोकणात, दक्षिण कोकण आदी भागात पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. येत्या २६ जूनपर्यंत या भागात पावसाचा जोर कायम राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. बहुतांश भागात पावसाची हजेरी असेल तसेच मुसळधार पावसाचा इशारा या भागांसाठी देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मात्र एक किंवा दोन ठिकाणीच पावसाची हजेरी असेल. तर विदर्भात खूप कमी ठिकाणी पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -