घरताज्या घडामोडीनाशिक शहरात ८५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक शहरात ८५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिक शहरात सोमवारी (दि.२२) दिवसभरात ८५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सहाजणांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकूण १६४ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. नाशिक महापालिकेच्या नगरचना विभागात करोनाने शिरकाव केला असून एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ८६१ रूग्ण करोनाबाधित आहेत. एकट्या नाशिक शहरात १ हजार २९४ रूग्ण असून ६८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात ६९३ करोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू असून ५३३ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

चार महिला, दोन पुरुषांचा मृत्यू
शहरात सोमवारी करोनाबाधित सहाजणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मनोहर गार्डन येथील ४० वर्षीय महिला, फकीर वाडी, हाजी अली मज्जिद, जुने नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध, हरी वंदन सोसायटी, उपनगर नाशिक येथील ६६ वर्षीय वृद्ध महिला, जुने नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिला, कोकणीपुरा येथील ८७ वर्षीय वृद्ध आणि कालिदास कला मंदिर, नाशिक परिसरातील ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत सर्व रूग्ण हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने मृतांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून त्यांना क्वारंटाईन केले आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेतील कर्मचारी पॉझिटिव्ह
नाशिक महापालिकेच्या नगरचना विभागात करोनाने शिरकाव केला असून सोमवारी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कर्मचार्‍याचा भाऊ करोनाबाधित असल्याचे बोलले जात आहे. कर्मचारी चार दिवसांंमध्ये कोणाच्या संपर्कात आला आहे, याचा शोध आरोग्य विभागातर्फे घेतला जात आहे.

४४२ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात सोमवारअखेर १७ हजार ७६७ संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये २ हजार ८१४ रूग्ण पॉझिटिव्ह, १४ हजार ५११ रूग्ण निगेटिव्ह असून ४४२ रूग्णांचा अहवाल प्रलंबित आहे. यात नाशिक ग्रामीण ६६, नाशिक शहर १७४, मालेगाव २०२ रूग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

३०३ संशयित रूग्ण दाखल
आरोग्य विभागाने करोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रूग्णांना रूग्णालयांमध्ये दाखल केले आहे. जिल्हा रूग्णालय १६, नाशिक महापालिका रूग्णालये २२४, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ४, मालेगाव रूग्णालय १ आणि नाशिक ग्रामीण रूग्णालयात ५८ रूग्ण दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -