घरमुंबईRaj Thackeray: 'या' मागण्यांसाठी बचत गट आणि सहकारी संस्थांचे कर्मचारी राज ठाकरेंच्या...

Raj Thackeray: ‘या’ मागण्यांसाठी बचत गट आणि सहकारी संस्थांचे कर्मचारी राज ठाकरेंच्या भेटीला

Subscribe

मुंबई: बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबई महानगरपालिकेने साफ सफाईचं कंत्राट खासगी कंपन्यांना दिल्यानं आणि काही मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची त्यांच्या मुंबईस्थित निवासस्थानी शिवतीर्थावर भेट घेतली आहे. (Raj Thackeray Employees of self help groups and cooperatives visit Raj Thackeray to demand )

समोर आलेल्या माहितीनुसार, डीप क्लीनींग करण्यासाठी पालिकेने कंत्राट खासगी कंपन्यांना दिलं आहे. परंतु, बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, जेव्हा गरज होती तेव्हा आमच्याकडून साफ सफाई करून घेतली आणि काम द्यायची वेळ आली, तेव्हा मात्र मोठ्या ठेकेदारांना दिली जातात. यात म्हटलंय की, 80 टक्के कामाचा अनुभव असावा, त्या ठेकेदारांना 10 टक्के तरी अनुभव आहे का? मग त्यांना कंत्राट का देण्यात आलं? असा प्रश्नही आता या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, पालिकेने खासगी कंपन्यांना दिलेलं टेंडर तत्काळ रद्द करून, ते आमच्या संस्थांना द्यावं आणि आमचं मानधन वाढवावं, अशा मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

  • खासगी कंपन्यांना साफ सफाईचं टेंडर देऊ नये
  • या कंपन्यांना दिलेलं टेंडर तत्काळ रद्द करावं
  • बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचं कंत्राट दिलं जावं
  • बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवावं

2001 पासून आम्ही मुंबईची साफसफाई करत आहोत. कोरोना काळातदेखील आरोग्याची चिंता न करता आम्ही साफसफाई केलेली आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार जाऊ नये, यासाठी राज ठाकरेंची भेट घ्यायला आल्याचं, कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरेंचं आश्वासन काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा संपूर्ण विषय समजून घेतला आहे. भेटीसाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंनी घरात बोलावून घेतलं आणि या संपूर्ण विषयाची माहिती घेतली. तसंच, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी स्वत: बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -