घरमुंबईचिमूरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १० वर्ष सक्तमजुरी

चिमूरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास १० वर्ष सक्तमजुरी

Subscribe

श्रीरामपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सदर मुलगी गर्भवती झाल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एम.सलीम यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

श्रीरामपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सदर मुलगी गर्भवती झाल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एम.सलीम यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. विकास जालिंदर चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर शहरात सदरची पिडीत मुलीचे आई वडील बाहेर गेले असता मुलगी घरात एकटीच आहे, असे पाहून आरोपी विकास चव्हाण याने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर १५ दिवसांनी आरोपीने पुन्हा एकदा या मुलीवर अत्याचार केला. पिडीत मुलगी या अत्याचारामुळे गर्भवती झाली. तिने नंतर एका मुलास जन्म दिला. दरम्यान पिडितेने फिर्याद दाखल केल्यानंतर श्रीरामपूर पोलीसांनी आरोपी विकासच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एम.सलीम यांच्या न्यायालयात झाली असून सुनावणी दरम्यान १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. पिडीत मुलगी, तिची आई, ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर, नगरच्या जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर आणि ससून रूग्णालयातील डॉक्टर यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या आहेत. पिडीत मुलीने जन्म दिलेल्या बाळाचा डीएनए आणि आरोपी विकास याचा डीएनए एकच आल्याने तो पुरावा खूपच महत्वाचा मानला गेला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एम.सलीम यांनी आरोपी विकास चव्हाण याला दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -