घरमुंबईअंधेरीच्या बालभवनातून बलात्कार पीडित मुलगी गायब

अंधेरीच्या बालभवनातून बलात्कार पीडित मुलगी गायब

Subscribe

अंधेरीतील बालभवनातून एका बलात्कार पीडित १५ वर्षांची मुलगी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून या मुलीचा शोध सुरू केला आहे. अंधेरीतील विरा देसाई रोडवर एक मुलींचे बालभवन असून तिथेच गुरुवारी १० ऑक्टोबरला या बलात्कार पीडित १५ वर्षांच्या मुलीला आणण्यात आले होते. या मुलीचे अपहरण करुन नंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला होता. हा प्रकार उघडकीस येताच आरोपीविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहरणासह बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात नंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर या मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

बोरिवलीतील बालकल्याण समितीच्या आदेशानंतर तिला अंधेरीतील मुलींसाठी असलेल्या बालभवनात ठेवण्यात आले होते. दहा ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत ती तिथेच राहात होती. मात्र, मंगळवारी १५ ऑक्टोबरला सर्व मुली जेवणानंतर आंघोळीला गेल्यानंतर ती बालभवनातून गायब झाली. हा प्रकार नंतर तिथे असलेल्या केअरटेकर महिलांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. ती तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी तिच्या मालवणीतील राहत्या घरी गेली असावी, असा संशय होता. त्यामुळे या महिला अधिकार्‍यांनी तिथे जाऊनही चौकशी केली होती. मात्र, ती तिथेही आली नव्हती. या घटनेनंतर अखेर त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या मुलीचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -