घरमुंबईपरीक्षा वेळापत्रकावरून आयडॉलचा गोंधळ; विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे

परीक्षा वेळापत्रकावरून आयडॉलचा गोंधळ; विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे

Subscribe

एफवायबीएच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाने (आयडॉल) संकेतस्थळावर जाहीर केले. मात्र, काही दिवसांतच वेळापत्रक संकेतस्थळावरून गायब झाल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले असून एकच गोंधळ झाला आहे.

एफवायबीएच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाने (आयडॉल) संकेतस्थळावर जाहीर केले. मात्र, काही दिवसांतच वेळापत्रक संकेतस्थळावरून गायब झाल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आयडॉलकडे विचारणा केली असता ‘आम्ही असे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकलेच नसल्याचे’, सांगत त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. त्यामुळे अधिकच संभ्रमात पडलेल्या विद्यार्थ्यांसमारे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संकेतस्थळावरील वेळापत्रक खरे की खोटे?

एफवायबीएच्या दुसर्‍या सत्राचे वेळापत्रक १४ ऑक्टोबरला संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ते वेळापत्रक संकेतस्थळावरून डाऊनलोड केले. मात्र, दोनच दिवसांत वेळापत्रक संकेतस्थळावर काढण्यात आले. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने विद्यापीठाकडे धाव घेत यासंदर्भात विचारणा केली. तसेच काही विद्यार्थी हे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे अभ्यासक्रमासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयडॉलमध्ये आल्यावर त्यांना संकेतस्थळावरून वेळापत्रक काढल्याचे लक्षात आले. मात्र, यावर विद्यापीठ प्रशासनाकडून आम्ही कोणतेच वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकच गोंधळाचे वातावण निर्माण झाले आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रक खरे की खोटे होते. परीक्षा कधी सुरू होणार आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले असल्याची माहिती स्टुडंट लॉ काऊन्सिलचे सचिन पवार यांनी दिली.

- Advertisement -

वेळापत्रकात काही सूचना टाकायच्या होत्या. त्यामुळे ते संकेतस्थळावरून काढले आहे. दोन दिवसांत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचनांसह वेळापत्रक टाकण्यात येईल. हॉल तिकीट परीक्षेच्या चार ते पाच दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन उपलब्ध होईल. – विनोद माळाळे, जनसंपर्क अधिकारी; आयडॉल


हेही वाचा – एलिमेंटरी, इंटरमिजिएट परिक्षा लांबणीवर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -