घरमुंबईमध्य रेल्वेवर ‘नाईट मेगाब्लॉक’

मध्य रेल्वेवर ‘नाईट मेगाब्लॉक’

Subscribe

दिवा ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

दिवा ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान, कल्याण स्थानकातील नव्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

असा करा प्रवास

मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी रात्री १.१० ते पहाटे ३.४० आणि डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान ५ आणि ६ फलाटावरील रेल्वे मार्गावर रात्री १.१० ते पहाटे ५ वाजेपर्यंत काम करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी रात्री १ ते मध्यरात्री ३.३० वाजेपर्यंत दिवा-कल्याण दरम्यान अप धिम्या मार्गावर तर डाऊन धिम्या मार्गावर रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान दिवा स्थानकातून डाऊन धिम्या मार्गावर रात्री १२.३९, १२.५३, १.२, १.१३, १.२३ आणि १.३३ च्या लोकल डाऊन जलद मार्गावरुन धावणार आहेत. परिणामी या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात थांबणार नाहीत. तसेच ब्लॉक कालावधीत डाउन मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्या देखील आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -