घरमुंबईमहिला निर्मातीला धमकी, रवी पुजारीच्या गुंडाला अटक

महिला निर्मातीला धमकी, रवी पुजारीच्या गुंडाला अटक

Subscribe

महिला निर्माता-दिग्दर्शक मंजू मुकेश भारती यांच्याशी फोनवरुन अश्लील संभाषण करुन धमकी दिल्याप्रकरणी रवी पुजारी टोळीचा गुंड सत्येंद्रकुमार अनुजदयाल त्यागी याला गुरुवारी आंबोली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सत्येंद्रकुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खंडणीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. मंजू भारती या निर्माता-दिग्दर्शक असून त्यांची विवेक फिल्म प्रोडक्शन हाऊस नावाची एक कंपनी आहे. जून 2012 रोजी त्यांची एका इव्हेंट कार्यक्रमांत सत्येंद्रकुमारशी ओळख झाली होती. त्याने तो विकासक असून त्याची उत्तर प्रदेशात प्रॉपटीचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

छोट्या भूमिकेचा प्रस्ताव
यावेळी त्या ‘काश तुम होते’ नावाचा चित्रपट करीत होत्या. या चित्रपटाच्या त्याच दिग्दर्शक म्हणून काम पाहत होत्या. त्यामुळे त्याने चित्रपटात साठ लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला सत्तर लाख रुपये परत करावे असे सांगून चित्रपटात एक छोटी भूमिका देण्याची विनंती केली होती. त्यांनीही त्याचा प्रस्ताव मान्य केला. मात्र दोन दिवसांच्या शूटींगला त्याने दहा दिवस लावले, त्यामुळे त्यांचे बजेट वाढले. यावेळी त्याने 35 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप करुन त्यांच्याकडून पैशांची मागणी सुरु केली होती. याच दरम्यान त्यांच्या घरी तो एका मुलीला घेऊन आला होता. त्याला मंजू भारती यांनी विरोध करताच त्याने मी तुमच्याकडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्यामुळे तुमच्या सर्व वस्तूंवर माझा अधिकार आहे असे सांगून माझ्यासोबत पंगा घेऊ नका, मी रवी पुजारीचा खास माणूस आहे अशी धमकी दिली.

अश्लील संभाषण
12 डिसेंबरला तीन वेगवेगळ्या मोबाईलवरुन अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करुन त्यांच्याशी अश्लील संभाषण केले. तसेच त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सत्येंद्रकुमार हा इच्छुक असल्याचे सांगितले. या फोननंतर सत्येंद्रकुमारनेही त्यांच्याशी अश्लील संभाषण केले होते. जुलै 2018 रोजी सत्येंद्रकुमारने प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक पार्थ घोष यांना फोन करुन मंजू भारती यांचा मुलगा कुठल्या शाळेत शिकतो अशी विचारणा केली होती.

- Advertisement -

खंडणीच्या गुन्ह्यात अटक
मैने रेमो डिझोसा के साथ क्या किया पत्ता है ना, असे सांगून त्यांनाही धमकी दिली होती. या घटनेनंतर मंजू भारती यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने सत्येंद्रकुमारला गुरुवारी ओशिवरा येथील लोखंडवाला संकुल, बरिस्ता कॅफेमधून शिताफीने अटक केली. पोलीस तपासात तो रवी पुजारीचा खास सहकारी असून त्याला यापूर्वी खंडणीविरोधी पथकाने खंडणीच्या एका गुन्ह्यात अटक केली. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला शुक्रवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी न्यायालयाने त्याला 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -