घरमुंबईभाजपच्या सर्वाधिक 27 मतदारसंघात बंडखोर

भाजपच्या सर्वाधिक 27 मतदारसंघात बंडखोर

Subscribe

मनधरणीसाठी फोनवर फोन

राज्य विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपतील बंडखोरांनी त्या पक्षाच्या नेत्यांची झोप उडवून दिली आहे. पक्षात मोठ्याप्रमाणात इनकमिंग झाल्याने निष्ठावंतांना उमेदवारी मिळू शकली नाही. यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. या उमेदवारांना रोखण्यासाठी भाजपची चांगलीच तारांबळ उडत आहे. प्रदेश भाजपच्या कार्यलयातून या बंडखोरांना रोखण्यासाठी आकाश पाताळ एक केला जात आहे. भाजपच्या अशा बंडखोरांची संख्या २७ असून, त्यांच्यामुळे पक्षाच्या जागा कमी होण्याची भीती नेत्यांना आहे. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत बंडखोरांना माघार घ्यायला लावण्याचा पण त्या पक्षाने हाती घेतला आहे. या उमेदवारांपुढे नाकदुर्‍या काढण्यासाठी फोनवर फोन केले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली. तर काही इच्छुक उमेदवारांनी निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरु केली होती. युती शक्यता धुसर असल्याचे दिसू लागताच काहींना उमेदवारीची तयारी करण्याचे सांगण्यात आले. आता युती झाल्याने ज्यांना तयारी करण्यास सांगण्यात आले त्यांना उमेदवारी मिळणे दुरापास्त बनले आहे. युतीमुळे पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज इच्छुक उमेदवारींनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपच्या ताब्यात असलेल्या अशा 27 मतदारसंघात तब्बल 114 जणांनी बंडखोरी केली आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भाजपचे सर्वाधिक बंडखोर असून या ठिकाणी 9 जणांनी उमेदवारी भरली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा (सोमवार) शेवटचा दिवस असल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उद्या नेमके कितीजण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात त्यावर राज्याच्या राजकारणीची गणितं ठरु शकतात.

- Advertisement -

मागील अनेक दिवसांपासून मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी करत असताना ऐन मोक्याच्या क्षणी शुल्लक चुकीमुळे काही नेत्यांना निवडणुकीपासून दूर रहावे लागत आहे. राज्यातील 798 इच्छूकांना त्यांनी केलेल्या चुकीमुळे निवडणुकीपासून दूर रहावे लागत आहे. राज्यभरातील तब्बल 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे विजयासाठी प्रत्येकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -