घरताज्या घडामोडीCorona Effect: शिक्षण क्षेत्रातील पदभरती बंद

Corona Effect: शिक्षण क्षेत्रातील पदभरती बंद

Subscribe

कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने शालेय शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्रातील पदभरती बंद केली आहे. या संदर्भातील आदेश शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशिला चौधरी यांनी काढले आहेत. कोविड-१९ या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. वित्तीय उपाययोजना म्हणून परभरतीस बंदी घातली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या खासगी, अल्पसंख्यांक, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील सर्व पदांना हा नियम लागू राहणार आहे.

राज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनही शिक्षकांची भरती अर्धवट अवस्थेत आहे. वित्त विभागाने १६ हजार १२४ शिक्षकांच्या भरतीला परवानगी दिली होती. त्यापैकी १२ हजार नव्या शिक्षकांची भरती झालेली आहे. काही कारणामुळे काही पदांच्या भरती अर्धवट अवस्थेत आहेत. या भरतीचे काय होणार असाही संभ्रम आता टीईटी आणि सीईटी उतीर्ण धारकांतून पुढे येत आहे.

- Advertisement -

पदभरती मागे घ्या

जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित छोट्या शाळांना पदभरती बंदीचा मोठा फटका बसेल. तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक हे विषयनिहाय अध्यापन करतात. त्यातच विज्ञान-गणित शिकविणारा एकच शिक्षक जूनमध्ये निवृत्त झाला तर त्याविषयाचे अध्यापन कुणी करावे? त्यामुळे सरसकट पदभरती बंदी न करता इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयांना भरती बंदीतून वगळावे, अशी मागणी भाजपाचे शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या योद्ध्यांना शहीद दर्जा द्या – शशांक राव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -