घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या योद्ध्यांना शहीद दर्जा द्या - शशांक राव

CoronaVirus: कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या योद्ध्यांना शहीद दर्जा द्या – शशांक राव

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्र पाठवले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली आहे.

कोरोना विरोधात लढणासाठी कर्तव्यावर उपस्थितीत असलेल्या पोलिस, महापालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी आणि इतर आस्थापणातील कर्मचारी कोरोनाबाधित होऊन मृत्युमुखी पडलेल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती देण्याची मागणी दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन केली आहेत. या संबधित पत्र सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहेत.

कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले बेस्ट उपक्रम मुंबई महानगरपालिका यांचे कर्मचारी, इतर आस्थापनांतील कर्मचारी आणि पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशवासीयांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी लढत आहेत. दुर्देवाने यापैकी अनेक जणांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी आणि त्यांच्या योग्य सन्मान राखण्याचे कर्तव्य सर्वांवर आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या विरोधात लढणाऱ्या आणि या लढ्यात मृत्यूला सामोरे गेलेल्या या सर्व योद्ध्यांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शहीद दर्जा देऊन त्यांच्या सन्मान करावा तसेच शासन पत्रिपत्रकानुसार सर्व सवलती त्यांच्या कुटूंबियांना कायदेशीर वारसांना लागू करण्याची मागणी दि बी.ई.एस.टी वर्कर्स युनियनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. यासंबंधित पत्रसुद्धा मुख्यमंत्र्यांनी येणार पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली आहे

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! कैद्याने गुप्तांग कापून शिवलिंगावर केलं अर्पण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -