घरCORONA UPDATECorona Live Update: ठाणे जिल्हयात चिंता वाढली रूग्णांचा आकडा १३००

Corona Live Update: ठाणे जिल्हयात चिंता वाढली रूग्णांचा आकडा १३००

Subscribe

ठाणे जिल्हयात करोनाबाधित रूग्णांचीसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच मंगळवारी जिल्हयात सर्वाधिक ११५ रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्हयात करोनाबाधित रूग्णांची संख्या एक हजार ३९७ वर पोहचली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हयात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ठाण्यात मंगळवारी  एकाच दिवशी १६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.या रुग्णांना मध्ये एक ९० वर्षाच्या आजींचा तसेच ५ वर्षांखालील ३ बालकांचा तसेच एका छोट्या बाळाचाही समावेश आहे.


 

- Advertisement -

८७ वर्षीय महिलेच्या सहवासीत ६० वर्षीय पुरुष आणि मुंबई मधील वडाळ्याच्या पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी यांची कोरोना चाचणी पोसिटिव्ह आली आहे. यामुळे उल्हासनगर मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १६ झाली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईच्या वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत ३० वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पोसिटीव्ह आली आहे. प्राप्त माहितीनुसार हा पोलीस कॅम्प ३ मधील शांतीनगर येथे राहण्यास आहे. चार दिवसांपूर्वी कॅम्प ३ मधील फॉरवर्ड लाईन येथे राहणाऱ्या ८७ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. ह्या महिलेच्या सहवासीत ६० वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पोसिटीव्ह आली आहे. यामुळे उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांचा आकडा १६ झाला आहे. आता तरी घरी रहा, सुरक्षित रहा, संक्रमण टाळा, असे आवाहन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.


औरंगाबादमध्ये एकाच दिवशी कोरोनाचे २४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३०१ झाली आहे.

- Advertisement -

विक्रोळीच्या माजी नगरसेविकेचा कोरोनाने मृत्यू

विक्रोळीतील काँग्रेसच्या माजी नगरसेविका यांचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये एक आठवड्यापासून उपचार सुरु होते. एक वर्षापासून त्या कर्करोगाने त्रस्त असून त्यांच्यावर उपचारही सुरु होते. दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या बच्छाव यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने विक्रोळीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मागील आठवड्यामध्ये प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने कन्नमवार नगरमधील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु करण्यात आले. परंतु वाढते वयोमान (वय ७७) आणि कर्करोगाने त्रस्त असल्याने मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विक्रोळीमध्ये गरजवंताना मदत करणाऱ्या नगरसेविका म्हणूनही त्या ओळखल्या जात.


महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ४५७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ४८ पोलीस अधिकारी असून ४०९ पोलीस कर्मचारी आहेत. यातले ३५ पोलीस कर्मचारी बरे होऊ घरी परतले आहेत. पण याशिवाय, राज्यात १८१ घटनांमध्ये पोलिसांवर हल्ला झाल्याचं समोर आलं आहे.


हिंगोलीत गेल्या २४ तासांत ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यामध्ये ३६ सीआरपीएफचे जवान तर एका परिचारिकेचा समावेश आहे.


नांदेडमध्ये ४ कोरोनाग्रस्त रुग्ण २ मेपासून फरार झाले आहेत. या चौघांविरोधात वजिराबाद येथील पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


देशभरात लॉकडाऊन ३.० सुरू झाल्यापासून काही राज्यांनी दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र, त्याचे उलट परिणाम आता पाहायला मिळू लागले आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये तळीरामांनी दारूच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी केल्याचं चित्र सोमवारी पहिल्या दिवशी दिसून आलं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील हीच परिस्थिती कायम आहे.

मालदीव आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विशाखापट्टणमवरून काही दिवसांपूर्वी आयएनएस जलसा श्रेणीतल्या १४ युद्धनौका निघाल्या आहेत, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -