घरमुंबईयंदा लाल मातीच्या मूर्तींना ग्राहकांकडून पसंती

यंदा लाल मातीच्या मूर्तींना ग्राहकांकडून पसंती

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून इकोफ्रेंडली उत्सवाबाबत केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी वाढत आहे. यंदा या मूर्तींमध्ये विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मूर्तिकारांनी केला.

गेल्या अनेक वर्षांपासून इकोफ्रेंडली उत्सवाबाबत केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी वाढत आहे. यंदा या मूर्तींमध्ये विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मूर्तिकारांनी केला. पारंपरिक शाडूच्या मातीच्या मूर्तींबरोबरच यंदा लाल मातीच्या मूर्तींना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. कल्याणात लाल मातीच्या मूर्तींना भक्तांची चांगलीच मागणी आहे. गणेश कार्यशाळेत गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात मूर्तिकार व्यग्र आहेत. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मूर्ती घेण्याबाबत अनेकांकडून जनजागृती करण्यात येत आहे. याचा परिणाम आता दिसू लागला आहे.

घरातील कुंडीतच बाप्पाचे विसर्जन

इकोफ्रेंडली गणेशमूर्तींकडे भक्तांची पावले आपसूक वळली आहेत. कल्याणातील गजानन कला केंद्र नरेश कुंभार  यांच्या कार्यशाळेत यंदा लाल मातीच्या ४०० मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. कर्नाटकातून ही माती आणली जाते. या मातीत कापूस असतो.  सात इंच ते चार फूटांपर्यंत मुर्ती बनविल्या आहेत. मातीला रंग नाही. त्यावर डोळे आणि आखणी केली जाते. लाल मातीच्या बाप्पाची मनोभावे पूजन केल्यानंतर कुटूंबियांसह घरातील कुंडीतच त्यावर पाणी वाहून विर्सजन करून त्यात एक रोपट लावल जात. त्याच मुर्तीचे दर्शन वर्षभर मिळते. लाल मातीच्या गणेश मुर्तीला भक्तांची मागणी वाढत आहे पर्यावरणाच्या दृष्टीने हे वेगळा प्रयत्न आहे असे कुंभार यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -