घरमुंबईमहापालिका निवडणुकीसाठी संघटना सोशल मीडियाचा वापर कमी करा!

महापालिका निवडणुकीसाठी संघटना सोशल मीडियाचा वापर कमी करा!

Subscribe

राज ठाकरे यांच्या मनसे पदाधिकार्‍यांना सूचना

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी संघटना बांधणीच्या कामावर लक्ष द्या. सोशल मीडियाचा वापर कमी करा. स्थानिक पत्रकारांना धरून राहा. तुमच्या कार्यक्रमाची माहिती त्यांना द्या. असे कार्यक्रम करा की स्थानिक पत्रकार देखील तुमच्यावर खूश असतील, अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकार्‍यांना केल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी राज ठाकरे ठाण्यात आले होते. ठाण्यातील सीकेपी हॉल येथे ठाकरे यांनी मनसैनिकांशी सुसंवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्यात येणार आहे. प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देण्यात येणार. पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार. 25 दिवसांनंतर ठाण्यात देखील प्रभाग अध्यक्षपदाला पर्याय देणार आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या तयारीला लागा. ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक आहेत. तेवढेच वार्ड, शाखाध्यक्ष मला पाहिजेत. शाखाध्यक्षांची संख्या जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे. अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका. एकमेकांशी जोडून राहा. पक्षबांधणी करा. नव्यांनी आणि जुन्यांनी एकमेकांशी वाद करू नका. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी विचार करा. त्याच्यासाठी मेहनत घ्या. जे नवीन येतील, जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकिटासाठी येऊ नका.

कोकणासह राज्यात उद्भवलेल्या पूरस्थितीला एकमेव कारण म्हणजे कोणत्याही गोष्टीचे नियोजन नसणे, राज्यात पहिल्यांदाच ही परिस्थिती उद्भवलेली नाही. दोन वर्षांपूर्वी ही परिस्थिती ओढवली होती. त्यातच राज्यात लोकवस्त्या नुसत्या वाढत आहेत. त्यांना आकार आणि उकार नाही. तो आकार आणि उकार द्यावा, असेही एकही सरकारला अद्यापही वाटत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

आगामी महापालिकेच्या होणार्‍या निवडणुकीच्यादृष्टीने ही महत्वाची बैठक होती. या बैठकीत निवडणूक आणि संघटना बांधणीच्या दृष्टीने पदाधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. तसेच पुन्हा येत्या १५-२० दिवसांनी ठाण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर प्रत्येकजण आपआपल्या परिने मदतीचे काम करत आहे. सध्याच्या घडीला मदतकार्य महत्वाचे आहे. तिथे जाऊन पाहण्यात अर्थ नाही. मदत पोहोचेल तेवढे चांगले असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीसंदर्भात तसेच कोणते कार्यक्रम हाती घ्यायचे यासाठी पदाधिकार्‍यांना एका पुस्तिकेचे वाटप देखील करण्यात येणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राज ठाकरे हे ठाण्यात आल्याने प्रसार माध्यमांनी छेडले असता मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या असून प्रसार माध्यमांनी काळजी करू नये, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -