घरमहाराष्ट्रदेशातील सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये !

देशातील सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये !

Subscribe

नागरी सुविधांची दाणादाण

गेल्या तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने माथेरानकरांसह नागरी सुविधांचीही पुरती दाणादाण उडवून टाकली आहे. अवघ्या 24 तासात झालेली 440 मिलिमीटर पावसाची नोंद देशामध्ये सर्वाधिक असल्याचा दावा हवामान अंदाज वर्तविणार्‍या स्कायमेटने केला आहे. अतिवृष्टीमुळे सखल भागांना तळ्याचे स्वरुप आलेले पहायला मिळाले. एकीकडे वीज पुरवठा बंद असताना मोबाईल यंत्रणाही ठप्प झाल्याने माथेरानचा जगाशी संपर्क तुटला होता.

अतिवृष्टीमुळे माथेरानकरांमध्ये भीतीचे वातवरण होते. त्यातच सोसाट्याचा वारा सतत वाहत असल्याने वातावरण अधिकच भयप्रद झाले होते. वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. शिवाय सर्वत्र पाणी साचल्याने घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. या दोन दिवसात नेरळ-माथेरान घाटात दोन वेळा दरड कोसळली. नेरळ-माथेरान मिनिट्रेन मार्गात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. सुदैवाने मिनिट्रेन सेवा बंद असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

- Advertisement -

पाणी काही व्यापार्‍यांच्या दुकानात, तर काही घरांमध्ये शिरले. माथेरानचा भाग उताराचा असल्याने पाण्याचा निचरा लवकर होत असला तरी प्रवाहाचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून चालताना गुडघ्यापर्यंत पाणी लागत होते. 5 ऑगस्टपर्यंत 4 हजार 673 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -