घरमुंबईमुंबईत लेप्टोचा त्रास; पावसात भिजला असाल तर ७२ तासांमध्ये करा तपासण्या

मुंबईत लेप्टोचा त्रास; पावसात भिजला असाल तर ७२ तासांमध्ये करा तपासण्या

Subscribe

पावसाचे पाणी तुंबलेल्या रस्त्यावरुन चालल्यामुळे आता मुंबईकरांना लेप्टो आजाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पावसात भिजला असाल तर ७२ तासांमध्ये तपासण्या करणे गरजेचे आहे.

मुंबईत जुलै महिन्यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. एकीकडे या पावसाने मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात केली. तर, दुसरीकडे बऱ्याच लोकांचा जीव घेऊन मुंबईकरांना दु:खालाही सामोरे जावे लागले. आता या पावसात मुंबईत आणखी एक समस्या होऊ शकते ती म्हणजे पावसाचे पाणी तुंबलेल्या रस्त्यावरुन चालल्यामुळे आता मुंबईकरांना लेप्टो आजाराचा त्रास होऊ शकतो. रस्त्यावरील उंदीर, कुत्रे, मांजरी आणि म्हशी अशा जनावरांच्या मलमूत्राचा पाण्याशी संपर्क आला तर लेप्टोस्पायरोसिस या आजारांची भीती वाढते. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जर मुंबईकर नागरिक पावसाच्या पाण्यातून चालले असतील तर त्यांनी २४ ते ७२ तासांच्या आत महापालिका हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करुन घेतली पाहिजे.

गेल्या वर्षी लेप्टोमुळे १२ जणांचा मृत्यू

चार पाय असणाऱ्या असणाऱ्या प्राण्यांच्या मलमूत्रात लेप्टोस्पायरा नावाचा एक सूक्ष्म जीव असतो. जो हा आजार पसरवतो. जर आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला जखमा झाल्या असतील तर हा जंतू त्या भागातून शरीरात प्रवेश करु शकतो. अशा अवस्थेत जर मुंबईकर पावसाचे पाणी साचलेल्या परिसरातून चालत असतील तर त्यांनी घर गेल्यावर किंवा कुठेही स्वच्छ पाणी उपलब्ध असेल तिथे जाऊन आपले पाय स्वच्छ धुवावेत. ताप आलाच तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी लेप्टोमुळे १२ जणांचा मृत्यू झाला होता. पण, हे ते रुग्ण मुंबईतले नसल्याचेही सांगण्यात आले होते.

- Advertisement -

लेप्टोला कसा कराल प्रतिबंध?

मुंबईत ज्या प्रकारे पाऊस पडतो आहे या परिस्थितीत पाणी साचणाऱ्या परिसरात जाणे टाळा.
शरीरावर जखमा असतील तर तात्काळ उपचार करा.
घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा. पाणी साचू देऊ नका.
पावसाळ्यात ट्रेकींग करण्यासाठी जाऊ नका.


हेही वाचा – मुंबईकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरिया पुन्हा पसरतोय

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांनो सावधान! बाहेरचे खाद्यपदार्थ ठरतील घातक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -