घरमुंबईनाराजी बाजूला ठेवून कामाला लागा - रामदास आठवले

नाराजी बाजूला ठेवून कामाला लागा – रामदास आठवले

Subscribe

भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा; नाराजगी बाजूला सारून महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्यासाठी कामाला लागावे, असे आदेश रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा; नाराजगी बाजूला सारून महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्यासाठी कामाला लागावे, असे आदेश आज रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या राज्य कमिटीच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

एका पदाधिकाऱ्याला मंत्रिपद मिळणार

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंबंधी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात अनेक चांगली कामे झाली आहेत. तसेच आगामी काळात राज्य सरकारतर्फे अनेक महामंडळात आरपीआयच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांना स्थान मिळणार आहे. राज्यात एका पदाधिकाऱ्याला मंत्रिपद मिळणार आहे. तसेच केंद्र सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे कोणताही आततायी निर्णय न घेता सर्व राज्यात भाजप शिवसेना आरपीआय महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा ठराव आज रिपब्लिक पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला. तसेच जे कार्यकर्ते पक्षाच्या अधिकृत आदेशाविरुद्ध काम करतील त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल असा इशारा आठवले यांनी आजच्या बैठकीत दिला.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. या प्रचारात अनेक जिल्ह्यांत रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विचारता घेतले पाहिजे. स्थानिक नेत्यांचे फोटो प्रचारात असले पाहिजेत. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सन्मानाने प्रचार मोहोमेत सामावून घेतले पाहिजे यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून चर्चा करणार आहे. तसेच, त्यासंबंधी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पत्र देणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी आज राज्य कमिटीच्या बैठकीत रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिले.

मित्र पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करू नका

मी यापूर्वी काँग्रेस; राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली असताना रिपब्लिकन पक्षाच्या स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढून तीनवेळा जिंकलो होतो. मात्र कधीही मित्र पक्षाचे चिन्ह स्वीकारले नाही. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षाचे चिन्ह घेऊ नये असा आदेश आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -