घरमनोरंजनबॉलिवूडची अभिनेत्री ते गुगल इंडियाची अधिकारी; मयूरीची कहानी

बॉलिवूडची अभिनेत्री ते गुगल इंडियाची अधिकारी; मयूरीची कहानी

Subscribe

“घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही…” हे गाणे नव्वदच्या दशकात चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. या चित्रपटातील अभिनेत्री आजही अनेकांच्या लक्षात आहे. मात्र १९९६ च्या ‘पापा केहते है’ या चित्रपटात दिसलेली ती अभिनेत्री काही दिवसानंतर अचानक बॉलिवूडमधून गायबच झाली. आता गायब झाली म्हणजे काही रिकामी बसली होती, असं थोडंचये. तर ती पुन्हा आपल्या क्षेत्रात कामाला लागली आणि आज ती गुगल इंडियाची हेड म्हणून काम करत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून औरंगाबदची कन्या ‘मयूरी कांगो’ आहे. मयूरी कांगो ही ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र कांगो यांची कन्या आहे.

आपल्या या नव्या इनिंगबद्दल बोलताना मयूरी म्हणाली की, “गुगल सोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप खूष आहे. एका दशकाहून अधिक काळ मी या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. गुगलच्या टीमसोबत काम करताना आनंद होत आहे.” मयूरी आयटी सेक्टरमध्ये खूप आधीपासूनच कार्यरत होती. वयाच्या १५ व्या वर्षी तिला सिनेसृष्टीत नसीम या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर सिनेसृष्टीत करियर करण्यासाठी तिने आयआयटी कानपूरमधून शिक्षण सोडले होते.

- Advertisement -

मयूरीचा १९९५ साली आलेला पापा कहते है हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यांनतर तिला होगी प्यार की जीत सारखा हीट चित्रपट मिळाला होता. त्यानंतर तिने नरगिस (२०००), थोडा गम, थोडी खुशी (२००१), डॉलर बाबू (२००१) आणि किट्टी पार्टी (२००२) अशा मालिकांमधूनही तिने काम केले होते. मात्र त्यानंतर सिनेसृष्टीत फार यश मिळत नसल्यामुळे तिने २००३ मध्ये आदित्य ढिल्लनसोबत लग्नगाठ बांधली होती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -