घरक्रीडा५ गडी राखत हैदराबादची दिल्लीवर मात

५ गडी राखत हैदराबादची दिल्लीवर मात

Subscribe

१३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या कालावधीत दिल्लीने हैदराबादचे ३ गडी तंबूत पाठवून जिंकण्याचे आव्हान दिले. हैदराबादने ते आव्हान सहज पेलले आणि पूर्ण केले.

हैदराबादने सलग तीन सामने जिंकून विजयाची घोडदौड सुरू ठेवली आहे. गुरूवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या १२ व्या मोसमातील १६ वा सामना रंगला होता. या सामन्यात हैदराबादने ५ गडी राखत दिल्लीला पराभूत केले. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीने १२० षटकांत १२९ धावा केले. त्यामुळे हैदराबाद समोर १३० धावांचे माफक आव्हान होते.

दिल्लीची सुरुवातच वाईट

दिल्लीची पाहिजे तशी सुरूवात झाली नाही. हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलामीवीर पृथ्वी शाॅचा त्रिफळा उडवला. पृथ्वीने ११ चेंडूत ११ धावा केल्या. यात त्याने २ चौकार मारले होते. सलामीवीर शिखर धवलही फार काही मोठी कामगिरी करु शकला नाही. त्याने १४ चेंडूत १२ धावा केल्या. त्यानंरत ॠषभ पंत, राहुल तेवतिया, संदीप शर्मा विशिष्ट अंतरात १५ ते २० धावांच्या फरकात बाद झाले. दरम्यान, कर्णधार श्रेयसने डाव सावरण्याचा बराच प्रयत्न केला. फटकेबाजी करण्याचा नादात तो झेलबाद झाला. त्याने ४१ चेंडूत ४३ धावा केले. त्यानंतर १५ चेंडूत १७ धावा करणारा ख्रिस माॅरिस झेलबाद झाला. रबाडाही फार काही कामगिरी करु शकला नाही. चौकार मारून तोही बाद झाला. अक्षर पटेलने शेवटी २३ धावा केले. त्यामुळे २० षटकांत दिल्ली १२९ धावांवर पोहोचली.

- Advertisement -

हैदराबादचा ५ गडी राखत विजय

दिल्लीने दिलेल्या १३० धावांचा पाठलाग करताना हैदराबादने दणकेबाज फलंदाजीला सुरुवात केली. हैदराबादने अवघ्या सहा षटकांत अर्धशतक पूर्ण केले. सलामीवीर जॉनी बेअरस्टॉने ९ चौकार आणि १ षटकार मारत ४८ धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरही बाद झाला. त्याने १८ चेंडूत १० धावा केल्या. त्यानंतर मनीष पांडे आणि विजय शंकरने डाव सावरला. परंतु, दोघेही झेलबाद झाले. त्यानंतर दीपक हुडाही बाद झाला. अखेर युसूफ पठाण आणि मोहम्मद शफी यांनी हैदराबादच्या विजयाचा झेंडा फडकवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -