घरमुंबईराज ठाकरे यांच्यानंतर आता नितीन सरदेसाईंची ईडी चौकशी

राज ठाकरे यांच्यानंतर आता नितीन सरदेसाईंची ईडी चौकशी

Subscribe

राज ठाकरे यांच्यानंतर आता नितीन सरदेसाई यांना देखील ईडीने नोटीस बजावली. त्यांची आज ईडीकडून चौकशी सुरु आहे.

कोहिनूर मील गैरव्यव्हार प्रकरणी ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनंतर आता मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांची चौकशी सुरु केली आहे. सरदेसाई यांना ईडीने चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नितीन सरदेसाई गुरुवारी ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीकडून सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. ईडीने कोहिनूर मील प्रकरणी याअगोदर राज ठाकरे यांना समन्स बजावले होते. ईडीने २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची चौकशी केली होती. तब्बल आठ तास ही चौकशी झाली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सरकारवर टीका केली गेली होती.

हेही वाचा – प्रसाद ओक राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर नाराज?

- Advertisement -

उन्मेश जोशींची देखील झाली चौकशी

कोहीनूर मील प्रकरणी याअगोदरही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांची देखील ईडीकडून चैकशी करण्यात आली आहे. त्यानंतर राज ठाकरेंची चौकशी ईडीकडून करण्यात आली. आता नितीन सरदेसाई यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडी चौकशीतून काहीही निष्पण्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. याशिवाय शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ईडीकडून काही साध्य होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -